TRENDING:

स्मॅशिंग स्मृती मंधानाचा विश्वविक्रम, ऑस्ट्रेलियाला चिरडले; सांगलीची मुलगी सचिन, रोहित, विराट सर्वांवर पडली भारी

Last Updated:

Smriti Mandhana Fastest ODI hundred: दिल्लीतील भारत-ऑस्ट्रेलिया महिला एकदिवसीय सामन्यात स्मृती मंधानाने अवघ्या 50 चेंडूत शतक ठोकत इतिहास घडवला. सलग दोन डावांत शतक झळकावून तिने विक्रमांचा पाऊस पाडला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
News18
News18
advertisement

नवी दिल्ली: दिल्लीतील भारत-ऑस्ट्रेलिया महिला एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या सामन्यात स्मृती मंधानाने पुन्हा एकदा इतिहास रचला. तिने फक्त 50 चेंडूत शतक झळकावले, जे भारतीय महिला क्रिकेटमधील सर्वात जलद शतक ठरले. याआधीच्या दुसऱ्या सामन्यात तिने 77 चेंडूत शतक ठोकले होते. अशा प्रकारे तिने सलग दोन सामन्यांत शतकं झळकावत विक्रम केला.

advertisement

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत सर्वबाद 412 धावा केल्या आहे. उत्तरादाखळ भारताने आक्रमक फलंदाजीने उत्तर दिले आहे. यात मंधानाच्या वादळी आणि विक्रमी शतकाचा समावेश आहे. स्मृतीने या सामन्यात 63 चेडूत 17 चौकार आणि 5 षटकारांसह 198.41च्या सरासरीने 125 धावा केल्या.

भारतीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतकाचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर होता. विराटने ऑस्ट्रेलियाविरुद्ध फक्त 52 चेंडूत नाबाद 100 धावा केल्या होत्या. ही खेळी त्याने 2013 साली जयपूरमध्ये केली होती. आता भारतीय क्रिकेटमध्ये स्मृतीचे नाव सुवर्ण अक्षरात लिहले जाईल. महिला आणि पुरुष क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतकाचा विक्रम स्मृतीच्या नावावर झाला आहे.

advertisement

advertisement

विक्रमांची मालिका

भारतासाठी सर्वात जलद शतकं (ODIमध्ये पुरुष आणि महिला):

50 चेंडूत स्मृती मंधाना (vs ऑस्ट्रेलिया, दिल्ली, 2025)

52 चेंडूत विराट कोहली (vs ऑस्ट्रेलिया, जयपूर, 2013)

advertisement

60 चेंडूत वीरेंद्र सेहवाग (vs न्यूझीलंड, हॅमिल्टन, 2009)

महिला ODI मधील सर्वात जलद शतकं (सर्व संघ):

45 चेंडूत मेग लॅनिंग (vs न्यूझीलंड, 2012)

50 चेंडूत स्मृती मंधाना (vs ऑस्ट्रेलिया, 2025)

57 चेंडूत करेन रोल्टन (vs दक्षिण आफ्रिका, 2000)

57 चेंडूत बेथ मुनी (vs भारत, 2025)

ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्चस्व

स्मृतीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकूण 4 शतकं ठोकली आहेत. हा विक्रम नॅट सिव्हर-ब्रंट (4) आणि टॅमी बोमाँट (4) यांच्या बरोबरीचा आहे. 

कॅलेंडर वर्षातील शतकांचा विक्रम

2024 मध्ये – 4 शतकं

2025 मध्ये आधीच 4 शतकं (आणि वर्ष अजून संपलेले नाही)

या कामगिरीमुळे ती ताझ्मिन ब्रिट्स (2025) च्या बरोबरीवर आली आहे.

महिला क्रिकेटमधील शतकांची यादी

मेग लॅनिंग – 15

सुजी बेट्स – 13

स्मृती मंधाना – 13

टॅमी बोमाँट – 12

पुरुषांच्या क्रिकेटमधील सर्वात वेगवान शतकांची यादी...

धावा चेंडू षटकार चौकार खेळाडू सामना मैदान दिनांक
149 31 16 9 ए. बी. डिव्हिलियर्स दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज जोहान्सबर्ग 18/01/2015
131* 36 14 6 सी. जे. अँडरसन न्यूझीलंड विरुद्ध वेस्ट इंडिज क्विन्सटाऊन 01/01/2014
102 37 11 6 शाहिद आफ्रिदी पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका नैरोबी 04/10/1996
106 40 8 9 ग्लेन मॅक्सवेल ऑस्ट्रेलिया विरुद्ध नेदरलँड्स दिल्ली 25/10/2023
101* 41 11 4 असीफ खान यूएई विरुद्ध नेपाळ कीर्तिपूर 16/03/2023
147 44 10 8 एम. व्ही. बाउचर दक्षिण आफ्रिका विरुद्ध झिम्बाब्वे पोटचेस्ट्रूम 20/09/2006
117 45 14 8 ब्रायन लारा वेस्ट इंडिज विरुद्ध बांगलादेश ढाका 09/10/1999
102 45 9 10 शाहिद आफ्रिदी पाकिस्तान विरुद्ध भारत कानपूर 15/04/2005
104 46 5 12 जे. डी. रायडर न्यूझीलंड विरुद्ध वेस्ट इंडिज क्विन्सटाऊन 01/01/2014
116* 46 9 8 जे. सी. बटलर इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान दुबई 20/11/2015
162* 47 14 7 जे. सी. बटलर इंग्लंड विरुद्ध नेदरलँड्स आमस्टलव्हीन 17/06/2022
118* 47 7 6 कॅमेरॉन ग्रीन ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका मॅके 24/08/2025
134 48 11 11 सनथ जयसूर्या श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान सिंगापूर 02/04/1996
106 49 14 9 ए. मार्करम दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका दिल्ली 07/10/2023
110* 50 9 6 जे. सी. बटलर इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान साउथॅंप्टन 11/05/2019
113 50 8 12 के. जे. ओ'ब्रायन आयर्लंड विरुद्ध इंग्लंड बेंगळुरू 02/03/2011
102 52 10 4 जी. जे. मॅक्सवेल ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका सिडनी 07/03/2015
100* 52 7 8 विराट कोहली भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया जयपूर 16/10/2013

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
स्मॅशिंग स्मृती मंधानाचा विश्वविक्रम, ऑस्ट्रेलियाला चिरडले; सांगलीची मुलगी सचिन, रोहित, विराट सर्वांवर पडली भारी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल