TRENDING:

Suryakumar Yadav : श्रेयस अय्यरच्या प्रकृतीसाठी सूर्यकुमारच्या आईने केली प्रार्थना, म्हणाल्या 'मला खूप वाईट वाटलं जेव्हा...'

Last Updated:

Suryakumar Yadav Mother Video : सूर्यकुमार यादव यांची आई श्रेयस अय्यर यांच्या प्रकृतीसाठी खास प्रार्थना केली. यावेळी सूर्यकुमार यादवची पत्नी देखील तिथं दिसली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Suryakumar Mother praying for Shreyas Iyer : टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी येथे झालेल्या वनडे मालिकेतील तिसऱ्या मॅचदरम्यान कॅच घेताना दुखापतग्रस्त झाला होता. ही दुखापत गंभीर असल्याने त्याला ऑस्ट्रेलियामध्येच काही काळासाठी आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं होतं. आता त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे. बीसीसीआयने श्रेयससाठी भारतातून स्पेशलिस्ट देखील पाठवले आहेत. अशातच दुसरीकडे, टी-20 टीमचा कर्णधार सूर्यकुमार यादवच्या आईचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Suryakumar Yadav Mother Video
Suryakumar Yadav Mother Video
advertisement

श्रेयससाठी सूर्याच्या आईने केली प्रार्थना

टीम इंडियाचा टी-20 कॅप्टन सूर्यकुमार यादवच्या आईने छठ पूजेदरम्यान श्रेयस अय्यर लवकरात लवकर ठीक व्हावा म्हणून प्रार्थना केली, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, सूर्यकुमार यादव यांची आई श्रेयस अय्यर यांच्या प्रकृतीसाठी खास प्रार्थना करत आहेत. यावेळी सूर्यकुमार यादवची पत्नी देखील तिथं दिसली.

advertisement

तो आपल्या घरी लवकर जाईल...

मात्र, सध्या सूर्याच्या आईचं कौतूक होताना दिसतंय. दुसऱ्याच्या लेकरासाठी सूर्याच्या आईने प्रार्थना केल्याने व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. जेव्हा त्याला लागलं तेव्हा मला खूप वाईट वाटलं. तो आपल्या घरी लवकर जाईल, यासाठी प्रार्थना करा, असं सूर्याच्या आईने म्हटलं आहे.

पाहा Video

श्रेयस ICU मधून बाहेर

श्रेयसची दुखापत अपेक्षेपेक्षा जास्त गंभीर निघाली. स्कॅनमध्ये 'प्लीहा' (Spleen) या अवयवाला दुखापत झाल्याचे निदान झालं, ज्यामुळे अय्यरला सिडनी येथील रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं. आता अय्यरला आयसीयू बाहेर हलविण्यात आलं आहे. श्रेयस अय्यरला यापूर्वीही इंजरीमुळे बऱ्याच काळासाठी क्रिकेटपासून दूर राहावं लागलं होतं. चाहत्यांना अपेक्षा आहे की, तो या इंजरीतून लवकरच रिकव्हर होईल आणि पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर दिसेल.

advertisement

टीम इंडियाचा संकटमोचक बेडवर

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सांधेदुखी होईल कमी, जेवणात समावेश करा कडीपत्ता आणि तिळाची चटणी, रेसिपीचा Video
सर्व पहा

दरम्यान, अय्यर सध्या केवळ वनडे फॉरमॅटमध्ये खेळताना दिसतो. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय टीममध्ये सामील झाला होता. मालिकेतील पहिल्या वनडे मॅचमध्ये त्याचा बॅट चालली नव्हती. मात्र, दुसऱ्या वनडे मॅचमध्ये अय्यरने 61 रनची महत्त्वपूर्ण इनिंग खेळली होती आणि तिसऱ्या विकेटसाठी रोहित शर्मासोबत 118 रनची भागीदारी करत 17 रनवर 2 विकेट्स गमावलेल्या भारतीय संघाला 264 रनपर्यंत पोहोचवण्यात मोठी भूमिका बजावली होती.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Suryakumar Yadav : श्रेयस अय्यरच्या प्रकृतीसाठी सूर्यकुमारच्या आईने केली प्रार्थना, म्हणाल्या 'मला खूप वाईट वाटलं जेव्हा...'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल