आशिया-पूर्व पॅसिफिक पात्रता फेरीतील ग्रुप स्टेजनंतर नेपाळ आणि ओमानने सुपर सिक्स फेरीत आपली प्रभावी कामगिरी सुरू ठेवली. नेपाळने सुपर सिक्स फेरीत तीन सामने खेळले आणि तिन्ही सामने जिंकले. याचसोबत नेपाळने फायनलमध्ये पोहोचून वर्ल्ड कपमधील स्थान निश्चित केले. नेपाळ तिसऱ्यांदा वर्ल्ड कपमध्ये आपले नशीब आजमावेल. दरम्यान, ओमाननेही टी-20 वर्ल्ड कपसाठी क्वालिफाय केलं आहे.
advertisement
20 वी टीम कोणती?
आशिया-पूर्व पॅसिफिक क्वालिफायरमधून 20 वी टीम होण्याचा मान युएई, जपान आणि कतारकडे आहे. उरलेले तीनही सामने या तिन्ही टीमसाठी महत्त्वाचे आहेत. युएईने जपानला हरवलं तर ते टी-20 वर्ल्ड कपसाठी क्वालिफाय होतील.
उरलेल्या सामन्यांचं समीकरण
या महिन्याच्या सुरुवातीला, झिम्बाब्वे आणि नामिबिया टी-20 वर्ल्ड कपसाठी क्वालिफाय झाल्या. सध्या, युएई, जपान आणि कतार पात्रतेच्या शर्यतीत आहेत. युएईने आशिया-पूर्व पॅसिफिक पात्रता फेरीच्या सुपर सिक्स टप्प्यात नेपाळ आणि ओमान या दोघांकडून पराभव पत्करला, परंतु सामोआवर विजय मिळवून ते तिसऱ्या स्थानावर आहेत. तर जपान चौथ्या स्थानावर आहे, त्यांचे युएई आणि ओमानविरुद्ध सामने शिल्लक आहेत. कतारला विजय आणि आशीर्वादाची आवश्यकता आहे, कारण त्यांना सामोआला हरवायचे आहे आणि इतर दोन्ही टीम पराभूत होतील, अशी प्रार्थना करायची आहे.
या 19 टीम क्वालिफाय
भारत, श्रीलंका, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, युएसए, वेस्ट इंडिज, आयर्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान, कॅनडा, इटली, नेदरलँड्स, नामिबिया, झिम्बाब्वे, नेपाळ, ओमान