TRENDING:

T20 World Cup : इंडियाच्या ग्रुपमध्ये 5 टीम, भारत-पाकिस्तान सामना कधी? टी-20 वर्ल्ड कपची सगळ्यात मोठी बातमी!

Last Updated:

टी-20 वर्ल्ड कप 2026 ला जवळपास अडीच महिने शिल्लक आहेत. भारत आणि श्रीलंकेमध्ये होणाऱ्या या स्पर्धेमध्ये 20 टीम खेळणार आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : टी-20 वर्ल्ड कप 2026 ला जवळपास अडीच महिने शिल्लक आहेत. भारत आणि श्रीलंकेमध्ये होणाऱ्या या स्पर्धेमध्ये 20 टीम खेळणार आहेत. आयसीसीकडून वेळापत्रकाची अधिकृत घोषणा करण्यात आली नसली, तरी स्पर्धेचं संभाव्य वेळापत्रक आणि ग्रुप समोर आले आहेत. टी-20 वर्ल्ड कपचे आयोजक आणि सध्याचे टी-20 वर्ल्ड चॅम्पियन असलेल्या भारताचा पहिला सामना युएसएविरुद्ध होणार आहे, तर भारत-पाकिस्तान यांच्यातली लढत 15 फेब्रुवारीला होण्याची शक्यता आहे.
इंडियाच्या ग्रुपमध्ये 5 टीम, भारत-पाकिस्तान सामना कधी? टी-20 वर्ल्ड कपची सगळ्यात मोठी बातमी!
इंडियाच्या ग्रुपमध्ये 5 टीम, भारत-पाकिस्तान सामना कधी? टी-20 वर्ल्ड कपची सगळ्यात मोठी बातमी!
advertisement

कुठे होणार भारत-पाकिस्तान मॅच?

भारत आणि श्रीलंकेमध्ये 7 फेब्रुवारी ते 8 मार्च 2026 दरम्यान टी-20 वर्ल्ड कपचं आयोजन केलं जाणार आहे. आयसीसीने अजून वेळापत्रकाची घोषणा केली नसली तरी रेव्हस्पोर्ट्सने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. कोलंबोमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात 15 फेब्रुवारीला मॅच होईल, असं या वृत्तात सांगण्यात आलं आहे. टी-20 वर्ल्ड कपच्या मॅच कोलंबोच्या दोन मैदानांमध्ये होतील, पण भारत-पाकिस्तान लढत यातल्या कोणत्या मैदानात होईल, हे अजून स्पष्ट झालेलं नाही.

advertisement

यावेळचा टी-20 वर्ल्ड कप मागच्या टी-20 वर्ल्ड कपच्याच फॉरमॅटमध्ये खेळवला जाणार आहे. 20 टीमना 5-5 टीमच्या चार वेगवेगळ्या ग्रुपमध्ये विभाजित करण्यात येणार आहे. टी-20 वर्ल्ड कप 2024 प्रमाणेच यंदाही भारत, पाकिस्तान आणि अमेरिका एकाच ग्रुपमध्ये असण्याची शक्यता आहे. मागच्या वेळी भारताने ग्रुप स्टेजमध्ये या दोन्ही टीमना पराभूत केलं होतं, तर पाकिस्तानचा अमेरिकेविरुद्ध पराभव झाला होता. यंदा पाकिस्तान आणि युएसए सोबतच भारताच्या ग्रुपमध्ये नामिबिया आणि नेदरलँड्सही असण्याची शक्यता आहे.

advertisement

सेमी फायनल कुठे होणार?

भारत-पाकिस्तान यांच्यातला सामना श्रीलंकेमध्ये होणार आहे, तसंच पाकिस्तान त्यांचे सगळे सामने श्रीलंकेत खेळेल कारण पाकिस्तानच्या टीमने भारतात खेळायला नकार दिला आहे. पाकिस्तानची टीम सेमी फायनलमध्ये आणि फायनलला पोहोचली तर हे दोन्ही सामने श्रीलंकेत होतील. तसंच श्रीलंकेची टीम सेमी फायनलला पोहोचली तरी तेदेखील त्यांचा सामना घरच्या मैदानातच खेळतील. पाकिस्तान आणि श्रीलंका टॉप-4 मध्ये पोहोचले नाहीत तर दोन्ही सेमी फायनल आणि फायनल भारतात होतील. सेमी फायनल भारतातल्या कुठल्या मैदानात होणार, याबद्दलची माहिती समोर आली नसली, तरी फायनल अहमदाबादला होणार आहे.

advertisement

टीम इंडियाचं संभाव्य वेळापत्रक

8 फेब्रुवारी- भारत विरुद्ध अमेरिका, अहमदाबाद

12 फेब्रुवारी- भारत विरुद्ध नामिबिया, दिल्ली

15 फेब्रुवारी- भारत विरुद्ध पाकिस्तान, कोलंबो

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
'परिस्थिती बरी नाही, जाऊ नको' मृत 'श्री'ची परिस्थिती ऐकून डोळ्यात येईल पाणी!
सर्व पहा

18 फेब्रुवारी- भारत विरुद्ध नेदरलँड्स, मुंबई

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
T20 World Cup : इंडियाच्या ग्रुपमध्ये 5 टीम, भारत-पाकिस्तान सामना कधी? टी-20 वर्ल्ड कपची सगळ्यात मोठी बातमी!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल