TRENDING:

IND U19 vs AUS U19 : ऑस्ट्रेलियाला धडकी भरवली, घरच्या मैदानावर भारताने उडवली दाणादाण; पहिल्याच दिवशी 17 विकेट

Last Updated:

भारतीय अंडर-19 संघ आणि ऑस्ट्रेलियन अंडर-19 संघ यांच्यातील दुसरा युवा कसोटी सामना 7 ऑक्टोबर रोजी मॅके येथे सुरू झाला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
IND vs AUS U19 : भारतीय अंडर-19 संघ आणि ऑस्ट्रेलियन अंडर-19 संघ यांच्यातील दुसरा युवा कसोटी सामना 7 ऑक्टोबर रोजी मॅके येथे सुरू झाला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय यजमानांना महागात पडला कारण भारतीय गोलंदाजांनी अर्धा संघ अवघ्या 32 धावांतच बाद केला. त्यानंतर संपूर्ण ऑस्ट्रेलियन संघ 135 धावांवर ऑलआउट झाला. प्रत्युत्तरात, भारतीय संघाने दिवसाचा खेळ संपेपर्यंत 7 विकेटच्या मोबदल्यात 144 धावा केल्या आहेत. टीम इंडियाने 9 धावांची आघाडी घेतली आहे.
News18
News18
advertisement

सामन्यात आत्तापर्यंत काय घडलं?

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय संघासाठी योग्य ठरला नाही आणि संघ पहिल्या डावात 135 धावांवर बाद झाला. कांगारू संघाकडून विकेटकीपर-फलंदाज अॅलेक्स ली यंगने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 108 चेंडूत 66 धावांची खेळी केली. यश देशमुखने 22 धावा आणि विल मलाझुकने 10 धावांचे योगदान दिले. संघातील उर्वरित 8 फलंदाज दुहेरी आकडाही गाठू शकले नाहीत. भारताकडून खिलन पटेल आणि हेनिल पटेल यांनी प्रत्येकी 3 विकेट घेतल्या, तर उद्धव मोहनने 2 आणि दीपेश द्रवेंद्रनने १ विकेट घेतली.

advertisement

भारताची सुरुवातही फारशी चांगली झाली नाही

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
बादशाही ते जनता भेळ, 57 वर्षांपासून पुण्यातील प्रसिद्ध भेळ ठिकाण, इथली चव भारीच!
सर्व पहा

कर्णधार आयुष म्हात्रे 8 धावांवर बाद झाला. भारताची सुरुवातही फारशी चांगली नव्हती. संघाने 17 धावांवर पहिली विकेट गमावली. सलामीवीर विहान मल्होत्रा ​​11 धावांवर बाद झाला. दुसरी विकेट 18 धावांवर पडली. आता कर्णधार आयुष म्हात्रे 8 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर वैभव सूर्यवंशी 20 धावांवर, राहुल कुमार 9 धावांवर, वेदांत त्रिवेदी 25 धावांवर, हरवंश पंगालिया 1 धावांवर आणि खिलन पटेल 26 धावांवर बाद झाले. हेनिल पटेल (22) आणि दीपेश द्रवेंद्रन (6) नाबाद परतले. ऑस्ट्रेलियाकडून केसी बार्टनने आतापर्यंत 3 बळी घेतले. विल बायरमने 2 बळी घेतले. चार्ल्स लॅचमंड आणि ज्युलियन ऑसबोर्न यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND U19 vs AUS U19 : ऑस्ट्रेलियाला धडकी भरवली, घरच्या मैदानावर भारताने उडवली दाणादाण; पहिल्याच दिवशी 17 विकेट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल