TRENDING:

टीम इंडियाच्या जर्सीवर दिसणार नवा लोगो, या कंपनीने प्रत्येक मॅचसाठी दिले 4.5 कोटी; BCCIला मिळणार 579 कोटी

Last Updated:

Team India Sponsor: टीम इंडियाच्या जर्सीवर आता अपोलो टायर्सचे नाव झळकणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ड्रीम11च्या बाहेर पडल्यानंतर 2027 पर्यंतचा नवा स्पॉन्सरशिप करार निश्चित झाला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
News18
News18
advertisement

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाच्या (टीम इंडियाच्या) नव्या जर्सी स्पॉन्सरचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता टीम इंडियाच्या जर्सीवर अपोलो टायर्स या कंपनीचे नाव झळकणार आहे. भारतीय क्रिकेट संघाचा नवा जर्सी स्पॉन्सर म्हणून या प्रतिष्ठित कंपनीला अंतिम मान्यता देण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे.

advertisement

या करारानुसार अपोलो टायर्स कंपनी संघाच्या प्रत्येक सामन्यासाठी सुमारे 4.5 कोटी रुपये खर्च करणार आहे. हे रक्कम मागील स्पॉन्सर ड्रीम11 ने दिलेल्या 4 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

भारतीय संघासोबतचा हा स्पॉन्सरशिप करार 2027 पर्यंत चालणार असून यात एकूण सुमारे 130 सामने समाविष्ट असतील. Times of Indiaच्या अहवालानुसार स्पॉन्सरशिपसाठी Canva आणि JK Tyre यांनी सहभाग घेतला आणि बोली लावली होती. तर Birla Optus Paints ने देखील रस दाखवला होता. पण बोली प्रक्रियेत ते उतरले नाहीत. ही बोली प्रक्रिया 16 सप्टेंबर रोजी झाली होती.

advertisement

बीसीसीआयने (BCCI) 2 सप्टेंबर रोजी भारतीय संघाच्या लीड स्पॉन्सर हक्कांसाठी Expression of Interest आमंत्रित केले होते. त्या जाहिरातीत बीसीसीआयने स्पष्ट केले होते की- गेमिंग, बेटिंग, क्रिप्टोकरन्सी आणि तंबाखू कंपन्यांना बोली लावण्यास बंदी असेल. तसेच एथलीजर आणि स्पोर्ट्सविअर उत्पादक, बँका, वित्तीय संस्था, शीतपेये (गैर-मद्ययुक्त), पंखे, मिक्सर-ग्राइंडर, सुरक्षा तिजोर्‍या आणि विमा कंपन्यांना देखील या प्रक्रियेसाठी पात्र ठरविण्यात आले नव्हते.

advertisement

ड्रीम11ला बाहेर पडावे लागल्यानंतर तात्काळ नव्या स्पॉन्सरची गरज निर्माण झाली होती. कारण सरकारच्या ऑनलाईन गेमिंग अधिनियम 2025 मधील प्रचार आणि नियमनामुळे ड्रीम11 या ब्रँडच्या कामकाजावर मोठा परिणाम झाला होता. याच कारणामुळे भारतीय क्रिकेट संघ सध्या दुबई आणि अबू धाबी येथे सुरू असलेल्या आशिया कप 2025 मध्ये जर्सीवर कोणत्याही स्पॉन्सरशिवाय खेळत आहे.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
टीम इंडियाच्या जर्सीवर दिसणार नवा लोगो, या कंपनीने प्रत्येक मॅचसाठी दिले 4.5 कोटी; BCCIला मिळणार 579 कोटी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल