TRENDING:

स्पिनला कसं खेळायचं, दाखवून दिलं! गंभीरने बाहेर केलेल्या स्टारची 176 रनची खेळी, आता तरी चान्स मिळणार?

Last Updated:

एकीकडे टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेच्या स्पिन बॉलिंगसमोर संघर्ष करत आहे, तेव्हाच भारतीय स्टार खेळाडूने स्पिन बॉलिंग कशी खेळायची? हे 176 रनची वादळी खेळी करून दाखवून दिलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : एकीकडे टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेच्या स्पिन बॉलिंगसमोर संघर्ष करत आहे, तेव्हाच भारतीय स्टार खेळाडूने स्पिन बॉलिंग कशी खेळायची? हे 176 रनची वादळी खेळी करून दाखवून दिलं आहे. टी-20 क्रिकेटमधून नाव कमावलेल्या रिंकू सिंगने रणजी ट्रॉफीमध्ये धमाकेदार खेळी करून उत्तर प्रदेशला अडचणीतून बाहेर काढलं आणि महत्त्वाचे 3 पॉईंट्स मिळवून दिले. तामिळनाडूविरुद्ध रिंकू सिंगने ही शानदार खेळी केली आहे, जी त्याच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमधली सर्वोत्तम आहे. रिंकू सिंगने 247 बॉलमध्ये 71 च्या स्ट्राईक रेटने 176 रन केले, ज्यात 17 फोर आणि 6 सिक्सचा समावेश होता.
स्पिनला कसं खेळायचं, दाखवून दिलं! गंभीरने बाहेर केलेल्या स्टारची 176 रनची खेळी, आता तरी चान्स मिळणार?
स्पिनला कसं खेळायचं, दाखवून दिलं! गंभीरने बाहेर केलेल्या स्टारची 176 रनची खेळी, आता तरी चान्स मिळणार?
advertisement

कोइम्बटूरमध्ये झालेल्या या सामन्यात रिंकूच्या शतकामुळे उत्तर प्रदेशला पहिल्या इनिंगच्या आघाडीमुळे तीन पॉईंट्स मिळाले. तामिळनाडूने पहिल्या इनिंगमध्ये 455 रन केले, त्यानंतर बॅटिंगला आलेल्या उत्तर प्रदेशने 460 रन करून मॅच ड्रॉ केली, पण पहिल्या इनिंगच्या आघाडीमुळे उत्तर प्रदेशला 3 पॉईंट्स देण्यात आले.

रिंकू सिंगच्या 176 रनशिवाय खालच्या क्रमांकावर शिवम मावीनेही 54 रनची खेळी केली. भारतीय टीम दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात स्पिनरना खेळताना संघर्ष करत आहे, तेव्हा रिंकूने 176 रनची मॅरेथॉन इनिंग खेळून त्याची टीम इंडियातली दावेदारी आणखी मजबूत केली आहे. रिंकू सिंगने 52 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 59.30 च्या सरासरीने 3,677 रन केले आहेत, या उल्लेखनीय कामगिरीमुळे रिंकू सिंगचा भविष्यात भारतीय टेस्ट टीममध्येही विचार होऊ शकतो.

advertisement

मुंबईचा दणदणीत विजय

दुसरीकडे मुंबईने पुदुच्चेरीवर इनिंग आणि 222 रननी विजय मिळवला आहे. पहिल्या इनिंगमध्ये मुंबईने त्यांचा डाव 630 रनवर घोषित केला, त्यानंतर पुदुच्चेरीचा 132 रनवर ऑलआऊट झाला, त्यामुळे मुंबईने फॉलोऑन दिला. यानंतर बॅटिंगला आलेल्या पुदुच्चेरीचा 276 रनवर ऑलआऊट झाला. 170 रनची खेळी करणाऱ्या सिद्धेश लाडला प्लेअर ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं.

advertisement

विदर्भने बडोद्याला हरवलं

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
तुमच्या घरी देखील लहान मुली मेकअप करतात? तर थांबवा, नाहीतर होतील गंभीर परिणाम 
सर्व पहा

माजी चॅम्पियन विदर्भने बडोद्याचा 144 रननी पराभव केला आहे. फास्ट बॉलर दर्शन नालकंडे (15/5) च्या सर्वोत्तम कामगिरीमुळे विदर्भला 6 पॉईंट्स मिळवण्यात यश आलं, त्यामुळे विदर्भ पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. विदर्भने दिलेल्या 276 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना मंगळवारी बडोद्याने 73 रनवर 5 विकेट गमावल्या होत्या, पण बुधवारी त्यांचा 131 रनवर ऑलआऊट झाला. विदर्भने पहिल्या इनिंगमध्ये 169 रन केले होते, त्यानंतर बडोद्याला 166 रन करता आले होते. दर्शन नालकंडेने 7 वर्षांच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच इनिंगमध्ये 5 विकेट घेतल्या.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
स्पिनला कसं खेळायचं, दाखवून दिलं! गंभीरने बाहेर केलेल्या स्टारची 176 रनची खेळी, आता तरी चान्स मिळणार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल