आशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या सामन्यात अभिषेक शर्मा आणि उपकर्णधार शुभमन गिल डावाची सुरुवात करतील. सूर्यकुमार यादव तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येईल, जो त्याच्या स्फोटक फलंदाजीने पाकिस्तानचा खेळ खल्लास करेल. तर चौथ्या क्रमांकावर तिलक वर्मा आपल्याच अंदाजात पाकिस्तानचा धुवून काढण्याचं काम करेल. तिलक वर्माने भारतासाठी 26 टी-ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 49 च्या सरासरीने 749 धावा केल्या आहेत.
advertisement
तर पाचव्या क्रमांकावर विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसन उतरु शकतो. संजू कोणत्या परिस्थितून सामना फिरवण्याची ताकद ठेवतो. संजू सॅमसनने टी-ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 3 शतके आणि 2 अर्धशतके केली आहेत. तसेच सहाव्या क्रमांकावर हार्दिक पांड्या याला संधी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, सूर्या पाकिस्तानविरुद्ध मोठा निर्णय घेऊ शकतो. सूर्या खेळपट्टीचा अंदाज घेऊन शिवम दुबे याला बाहेर बसवण्याची शक्यता आहे. कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती यांना बाहेर बसवणं शक्य नसल्याने सूर्याला शिवम दुबेला बाहेरचा रस्ता दाखवावा लागेल.
जर अर्शदीप सिंग संघात आला तर शिवम दुबेचा बाहेरचा रस्ता फिक्स मानला जातोय. त्यामुळे संघात संतूलन देखील दिसून येईल. एवढंच नाही तर बुमराहसोबत अर्शदीपची बॉलिंग किती घातक ठरणार? हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल.
टीम इंडियाची पाकिस्तानविरुद्धची संभाव्य प्लेइंग इलेव्हन - अभिषेक शर्मा, शुभमन गिल (उपकर्णधार), सूर्यकुमार यादव (कर्णधार), टिळक वर्मा, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग.