Team India Reach Asia Cup Final : बांग्लादेशचा 41 धावांनी पराभव करत टीम इंडिया आशिया कपच्या फायनलमध्ये पोहोचली आहे. आता टीम इंडिया उद्या बांग्लादेश आणि पाकिस्तान या संघातून जिंकणाऱ्या संघासोबत होणार आहे. या दोन्ही संघाना टीम इंडियाने याधी साखळी फेरीत आणि सुपर 4 मध्ये पराभवाची धूळ चारली आहे. पण असे जरी असले तरी सुर्याच्या टीमची एक चूक त्यांच्या हातून आशिया कपची ट्रॉफी हिसकावू शकतो? ही चूक नेमकी काय आहे? हे जाणून घेऊयात.
advertisement
टीम इंडिया गेल्या काही सामन्यात असंख्य कॅचड्रॉप करते. आजच्या सामन्यात टीम इंडियाने 4 कॅच ड्रॉप केल्या होत्या. विशेष म्हणजे या कॅच एकाच खेळाडूच्या होत्या. बांग्लादेशच्या सैफ हुसेनच्या कॅच भारताने ड्रॉप केल्या होत्या.विशेष म्हणजे या सामन्यात सैफ हुसेनने 69 धावांची खेळी केली होती. जर या खेळाडूला आणखी एका खेळाडूने साथ दिली असती तर भारताने आजचा सामना कदाचित गमावला असता.
या सामन्याधी भारताने पाकिस्तानविरूद्ध चार कॅच ड्रॉप केल्या होत्या.त्यावेळी भारतासमोर त्याचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान होता.त्यामुळे पाकिस्तानचा सामना देखील पलटू शकला होता,पण सुदैवाने भारताने दोन्ही सामने जिंकले होते.
आशिया कपमध्ये कोणत्या संघाने किती कॅच ड्रॉप केल्या...
१२ भारत (६७.५%)
११ हाँगकाँग, चीन (५२.१%)
८ बान (७४.१%)
६ श्रीलंका (६८.४%)
४ अफगाणिस्तान (७६.४%)
४ ओमान (७६.४%)
३ पाकिस्तान (८६.३%)
२ युएई (८५.७%)
कसा रंगला सामना
टीम इंडियाने दिलेल्या 168 धावांचा पाठलाग करताना बांग्लादेशची सुरूवात खराब झाली होती.कारण सलामीवीर तांजिद तमीम 1 धावांवर बाद झाला होता.त्यानंतर सैफ हसन आणि परवेज इमोनने बांग्लादेशचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला होता. या दरम्यान चांगला खेळत असलेला परवेज 21 धावांवर बाद झाला. त्यानंतर तौहीद हृदोय 7, शमीम हुसेन शुन्य आणि जेकर अली शुन्य धावांवर बाद झाला होता.
सैफ हसनने 69 धावांची एकाकी झूंज दिली पण त्याला बांग्लादेशला सामना जिंकवून देता आला नाही.आणि बांग्लादेश 127 धावांवर ऑल आऊट झाल आणि 41 धावांनी त्यांचा पराभव झाला. त्यामुळे टीम इंडिया आशिया कपच्या फायनलमध्ये पोहोचली आहे.
टीम इंडियाकडून कुलदीप यादव 3, जसप्रीत बुमराह वरूण चक्रवर्तीने प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या होत्या. आणि अक्षर पटेल आणि तिलक वर्माने प्रत्येकी 1-1 विकेट घेतली होती.
टीम इंडियाकडून सलामीवीर अभिषेक शर्माने 75 धावांची अर्धशतकीय खेळी केली होती.या खेळीत त्याने 5 षटकार आणि 6 चौकार लगावले होते. अभिषेक व्यतिरीक्त शुभमन गिलने 29 धावा आणि हार्दीक पांड्याने 38 धावा जोडल्या.या धावांच्या बळावर भारताने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 168 धावा केल्या होत्या.बांग्लादेशकडून रिषाद होसेने 2 विकेट काढल्या आहेत. तर तांजिम साकिब, मुस्ताफिजूर आणि सैफद्दीनने प्रत्येकी 1 विकेट काढल्या आहेत.
बांगलादेश (प्लेइंग इलेव्हन): सैफ हसन, तन्झिद हसन तमीम, परवेझ हुसेन इमोन, तौहीद ह्रदोय, शमीम हुसेन, जाकेर अली (कर्णधार-विकेटकीपर), मोहम्मद सैफुद्दीन, रिशाद हुसेन, तनझिम हसन साकिब, नसुम अहमद, मुस्तफिजुर रहमान
भारत (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), टिळक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती