Team india T20 Team Announce : भारत आणि साऊथ आफ्रिका यांच्यात सध्या वनडे मालिका खेळवली जात आहे. या मालिकेनंतर 9 डिसेंबर 2025 भारत साऊथ आफ्रिकेसोबत पाच सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी भारताच्या टी20 संघाची घोषणा करण्यात आली आहे.या संघात भारताच्या एका खेळाडूला संधीच मिळाली नाही आहे.त्यामुळे टेस्ट,वनडे नंतर आता टी20मध्ये त्या खेळाडूचं करिअर संकटात आलं आहे.त्यामुळे हा खेळाडू नेमका कोण आहे? हे जाणून घेऊयात.
advertisement
खरं तर हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून नितीश रेड्डी आहे. नितीश रेड्डीला ऑस्ट्रेलिया विरूद्ध बॉर्डर गावस्कर मालिकेत डेब्यूची संधी देण्यात आली होती. या डेब्यू सामन्यात त्याने शतकीय खेळी केली होती.या खेळीनंतर त्याला इंग्लंड विरूद्ध पाच सामन्याच्या टेस्ट मालिकेत संधी देण्यात आली होती. पण तो टेस्ट सामन्यात फ्लॉप ठरला होता.त्यात चौथ्या टेस्ट सामन्यात त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली होता. या दुखापतीनंतर वेस्ट इंडिज आणि साऊथ आफ्रिकेविरूद्ध तो खेळला पण त्याला लय सापडली नाही,त्यामुळे त्याच टेस्ट करिअर धोक्यात आलं.
तसेच नितीश रेड्डीने गेल्याच वर्षी ऑस्ट्रेलिया विरूद्ध वनडे मालिकेत डेब्यू केला होता. पण वनडेमध्ये देखील त्याला फारशी चांगली कामगिरी करता आली नव्हती.तसेच 6 ऑक्टोबर 2024 ला नितीशने ऑस्ट्रेलिया विरूद्ध घरच्या मैदानावर डेब्यू केला होता. पण या फॉरमॅटमध्ये देखील तो फारशी अशी चांगली कामगिरी करू शकला नाही.त्यामुळे आता त्याला साऊथ आफ्रिकेविरूद्ध टी20 मालिकेतूनही डावलण्यात आले आहे.
भारताचा टी20 संघ :
सुर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, वरूण चक्रवर्ती, अर्शदिप सिंह, कुलदीप यादव आणि वॉशिंग्टन सुंदर
