पाकिस्तानच्या अंडर 19 संघाने भारताला हरवून आशिया कप जिंकला आहे.त्यानंतर आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसीन नक्वी विजयी संघाला ट्रॉफी देण्यासाठी मैदानावर आले होते. यावेळी मोहसीन नक्वी यांनी पाकिस्तानी खेळाडूंना वैयक्तिकरित्या पदके आणि ट्रॉफी प्रदान केली होती. तर भारतीय संघाने मोहसीन नक्वी यांच्या हस्ते सेकंड रनर अप (उप विजेते पदाची) पदाची ट्रॉफी घेण्यास नकार दिला होता. आणि पोस्ट मॅच सेलिब्रेशनला भारतीय खेळाडू उपस्थित राहिले नव्हते. त्यामुळे भारताच्या सिनिअर टीम प्रमाणे ज्यूनिअर संघाने नक्वींची जिरवली आहे.
advertisement
खरं तर याआधी भारताने टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर मोहसीन नक्वी यांच्या हस्ते कप आणि मेडल स्विकारण्यास नकार दिला होता. या नकारानंतर मोहसीन नक्वी यांनी ट्रॉफी घेऊन मैदानातून पळ काढला होता.आता भारताच्या सिनिअर टीमप्रमाणे आयुष्य म्हात्रेच्या टीमने मोहसीन नक्वीला इंगा दाखवला आहे.
"आमच्यासाठी तो एक वाईट दिवस होता आणि पाकिस्तानने खूप चांगली फलंदाजी केली. अंतिम सामन्यात भारतीय संघाचे क्षेत्ररक्षणही खराब होते, पण सामन्यांमध्ये असे घडते. आमची योजना स्पष्ट होती.50 षटके फलंदाजी करायची, पण तसे झाले नाही. तथापि, संघाने चांगली कामगिरी केली आणि आम्ही अंतिम सामना वगळता या स्पर्धेतील प्रत्येक सामन्यात चांगली कामगिरी केली, जी आमच्यासाठी खूप सकारात्मक गोष्ट होती, असे सामन्यानंतर कर्णधार आयुष म्हात्रे म्हणाला होता.
