आशिया कप जिंकला तरी ट्रॉफी घेणार नाही
हँडशेक कॉन्ट्रोवर्सीनंतर टीम इंडिया आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. टीम इंडियाचा कॅप्टन सूर्यकुमार यादव हा आशिया कप जिंकला तरी देखील ट्रॉफी घेणार नाही, जर ACC म्हणजेच एशियन क्रिकेट काऊंसिलचे अध्यक्ष मोहसिन नकवी हे ट्रॉफी देणार असतील. मोहसिन नकवी हे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आहेत.
advertisement
स्टेज शेअर करणार नाही
जर सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ अंतिम फेरीत पोहोचला तर ते पाकिस्तान क्रिकेट बोर्ड प्रमुख मोहसिन नक्वी यांच्यासोबत स्टेज शेअर करणार नाही, असं निर्णय टीम इंडियाने घेतला आहे, अशी माहिती मीडिया रिपोर्टमधून समोर आली आहे.
पायक्रॉफ्टला रेफरी पॅनेलमधून काढून टाकण्याची मागणी
दरम्यान, पाकिस्तानच्या हँडशेक प्रकरणाच्या तक्रारीनंतर नवीद चीमा यांनी हे प्रकरण आयसीसीकडे नेले. त्यांनी पायक्रॉफ्टला रेफरी पॅनेलमधून काढून टाकण्याची मागणी केली आणि धमकी दिली की जर त्यांच्या अटी पूर्ण केल्या नाहीत तर पाकिस्तान आशिया कपमध्येच सोडेल.
Asia Cup मध्ये मोठा उलटफेर! अफगाणिस्तानच्या विजयानंतर 2 टीम सुपर-4 मध्ये पोहोचणार, पाहा कोण?
भारतीय संघ - अभिषेक शर्मा, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, जितेश शर्मा, रिंकू सिंह, अर्शदीप सिंग, हर्षित राणा.
पाकिस्तान संघ - सॅम अयूब, साहिबजादा फरहान, मोहम्मद हारिस (यष्टीरक्षक), फखर जमन, सलमान आगा (कर्णधार), हसन नवाज, मोहम्मद नवाज, फहीम अशरफ, शाहीन अफरीदी, सुफियान मुकीम, अबरार अहमद, हुसैन तलत, हसन अली, खुशदिल शाह, हारिस राऊफ, मोहम्मद वसीम ज्युनिअर, सलमान मिर्झा.