अहमदाबाच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या वर्ल्ड कप फायनल सामन्यात टीम इंडियाचा पराभव करण्यात ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ट्रेविस हेड याने मुख्य भूमिका बजावली. ट्रेविस हेडने 120 बॉलमध्ये केलेल्या 137 धावांमुळे ऑस्ट्रेलिया टीमला भारताने दिलेलं आव्हान 43 ओव्हरमध्ये पूर्ण करणं शक्य झालं. या जबरदस्त खेळीमुळे ट्रेविस हेड याला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला.
advertisement
ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर बंगाली मॉडेल आणि अभिनेत्री हेमोश्री भद्रा हिने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करून त्यात म्हणाली, " मी ट्रेविस हेडच्या नावाचे कुंकू माझ्या भांगेत भरले आहे. मी जेवढे याच्या विषयी विचार करते माझे गाल लाजून लाल होतात. माझ्या सुंदर हाताने मी याचा फोटो पकडला आहे. हा माझा पती व्हावा अशी माझी इच्छा आहे'. हेमोश्रीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.