चौथ्या कसोटीतील विजयानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने यावर स्पष्टीकरण दिले. ही गोष्ट कधीच मान्य होणार नाही. आता या प्रकरणावर भारताचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक नवज्योतसिंग सिद्धू यांनी एक्सवर पोस्ट करून प्रतिक्रिया दिली आहे. हेडचे हे वर्तन फक्त भारतीय नाही तर संपूर्ण क्रिकेटची मान शरमेने खाली घालवणार आहे. इतक नाही तर हा १५० कोटी भारतीयांचा अपमान आहे. ट्रेव्हिस हेडला शिक्षा देण्याची मागणी सिद्धू यांनी केली.
advertisement
अर्शदीप, स्मृतीला ICC क्रिकेटर ऑफ द इअर पुरस्कारासाठी नामांकन
अशी शिक्षा द्या पुन्हा कोणी हिम्मत करणार नाही
सिद्धू यांनी एक्सवर लिहलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, मेलबर्न कसोटीदरम्यान ट्रेव्हिस हेडने गलिच्छ पद्धतीने केलेला जल्लोष हा क्रिकेटच्या जंटलमॅन गेमसाठी नाही. हे सर्वात चुकीचे उदाहरण आहे.जेव्हा मुलं, महिला, युवक आणि ज्येष्ठ खेळ पाहत असतात. अशा प्रकराची कृती एका व्यक्तीसाठी (ऋषभ पंत) 1.5 अब्ज भारतीयांचा आणि एका राष्ट्राचा अपमान आहे. त्याला कोठोर शिक्षा दिली पाहिजे. जेणेकरून येणाऱ्या पिढीसाठी उदाहरण ठरेल. आणि अशा प्रकारची कृती करण्याची कोणी हिम्मत करणार नाही.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत वादात सापडण्याची ट्रेव्हिस हेडची ही दुसरी वेळ आहे. याआधी तो मोहम्मद सिराजला भिडला होता. १४० धावांवर सिराजने त्याला बाद केले होते. तेव्हा तो सिराजकडे पाहून काही तरी म्हणाला होता. त्यावर सिराजने देखील प्रतिक्रिया दिली होती.
