येत्या 7 फेब्रुवारीपासून या स्पर्धेला सुरुवात होत आहे. अमेरिकेचा पहिला सामना यजमान भारताविरुद्ध खेळणार आहे. अनुभवी यष्टीरक्षक-फलंदाज मोनांक पटेल पुन्हा एकदा संघाचे नेतृत्व करेल. 32 वर्षीय खेळाडूने 2024 च्या टी20 विश्वचषकात अमेरिकेचे नेतृत्वही केले होते. अमेरिकेचा हा सलग दुसरा टी20 विश्वचषक असेल. यापूर्वी, २०२४ मध्ये, संघाने पदार्पणाच्या स्पर्धेत पाकिस्तानला हरवून सुपर ८ मध्ये पोहोचून इतिहास रचला होता.
advertisement
संघात भारतीय, पाकिस्तानी आणि श्रीलंकेच्या वंशाच्या खेळाडूंचाही समावेश आहे. संघात 2024 च्या टी20 विश्वचषकात खेळलेल्या 10 खेळाडूंचा समावेश आहे.जेसी सिंग, अँड्रीस गॉस, मिलिंद कुमार, शायन जहांगीर, हरमीत सिंग, नोस्थुश केंजीगे, शॅडली व्हॅन शाल्कविक, सौरभ नेत्रावलकर आणि अली खान यासारखे अनुभवी खेळाडू संघात परतले आहेत. विशेषतः २०२४ च्या विश्वचषकात अमेरिकेसाठी सर्वाधिक धावा करणारा अँड्रीस गॉसनेही सहा विकेट्स घेतल्या.
याव्यतिरिक्त, काही नवीन चेहऱ्यांचाही संघात समावेश करण्यात आला आहे. शुभम रांजणे या स्पर्धेत टी-२० मध्ये पदार्पण करू शकतात, तर मोहम्मद मोहसिन आणि शिहान जयसूर्या हे देखील पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकतात. तसेच यामध्ये अली खान आणि मोहम्मद मोहसीन हे दोन्ही पाकिस्तानी वंशाचे खेळाडू आहेत. त्यासोबत सौरभ नेत्रावळकर व शुभम रांजने या दोन मराठमोठ्या खेळाडूंनाही संघात संधी मिळाली आहे.
अमेरिकेला गट अ मध्ये ठेवण्यात आले आहे, जिथे त्यांना भारत, पाकिस्तान, नेदरलँड्स आणि नामिबिया सारख्या बलाढ्य संघांचा सामना करावा लागेल. संघ ७ फेब्रुवारी रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारताविरुद्ध आपला सामना खेळेल. त्यानंतर १० फेब्रुवारी रोजी कोलंबोमध्ये त्यांचा सामना पाकिस्तानशी होईल आणि गट टप्प्यातील शेवटचे सामने चेन्नईमध्ये खेळवले जातील.
USA T20 विश्वचषक 2026 संघ: मोनांक पटेल (C), जेसी सिंग (VC), अँड्रिज गॉस, शेहान जयसूर्या, मिलिंद कुमार, शायन जहांगीर, सैतेजा मुक्कामला, संजय कृष्णमूर्ती, हरमीत सिंग, नोस्तुश केंजिगे, शेडली व्हॅन शाल्क्विक, मोहम्मद अली खान, मोहम्मद अली खान, मोहम्मद खान.
