Vaibhav Suryavanshi Ayush Mhatre verbal Fight with Ali Raza : दुबईच्या आयसीसीच्या अॅकडमीच्या मैदानावर सुरू असलेल्या अंडर 19 आशिया कपच्या फायनल सामन्यात मोठा राडा झाला आहे.या सामन्यात पाकिस्तानच्या अली राजाने वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेला स्वस्तात बाद केले होते.या विकेट काढल्यानंतर अली राजाने आक्रामक सेलीब्रेशन केले होते.या सेलिब्रेशमुळे वैभव आणि म्हात्रे प्रचंड भडकले होते,त्यामुळे ते अली राजाच्या अंगावर धावून गेले होते.त्यामुळे मैदानात राडा झाला होता. या राड्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.
advertisement
खरं तर पाकिस्तानने दिलेल्या 347 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताकडून वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे यांनी चांगली सुरूवात केली होती. यावेळी वैभव आणि आयुष म्हात्रेने पहिल्याच ओव्हरमध्ये 21 धावा कुटल्या होत्या. त्यानंतर अली राजाच्या तिसऱ्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर आयुष म्हात्रे कॅच आऊट होऊन 2 धावांवर बाद झाला होता. आयुषला बाद केल्यानंतर अली राजाने त्याच्याकडे पाहून आक्रामक सेलीब्रेशन केले होते. हे सेलीब्रेशन पाहून आयुष म्हात्रे प्रचंड भडकला आणि त्याने मागे वळून अली राजाला दिशेने जात त्याला काही शब्द सुनावले होते.त्यामुळे या राड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होते.
विशेष म्हणजे आयुषची विकेट काढल्यानंतर अली राजा शांत राहिला नाही त्याने लगेच वैभव सूर्यवंशीची विकेट काढली. या विकेटनंतरही त्याने वैभव सूर्यवंशीच्या दिशेने पाहून आक्रामक सेलीब्रेशन केले होते. हे सेलीब्रेशन पाहून वैभव देखील भडकला आणि जाता जाता अली राजाला दोन शब्द ऐकवून गेला.त्यामुळे मैदानात तुफान राडा झाला होता. या राड्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहेय
दोन्ही सलामीवीर बाद झाल्यानंतर आरोन जॉर्ज मैदानात आला. पण तो देखील 16 धावांवर बाद झाला.त्यामुळे भारताच्या 49 धावात 3 विकेट पडल्या होत्या. त्यानंतर विहान मल्होत्रा 7 वर वेदांत त्रिवेदी 9वर बाद झाला आहे.अशाप्रकारे भारताच्या 80 धावांमध्ये 5 विकेट पडल्या आहेत.
दरम्यान पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना चांगली सुरूवात केली होती. पाकिस्तानकडून हमजा जहूर आणि समीर मिन्हास सलामीला उतरले होते. या दोघांनी 3 ओव्हरमध्ये 31 धावा काढल्या होत्या. त्यानंतर समीरने उस्मान खानसह पाकिस्तानचा डाव सारवला होता. हा डाव सावरताना पाकिस्तानचे एकामागून एक विकेट पडत होते. पण समीर मिन्हास एकटा भारताच्या गोलंदाजांना भिडत होता.
समीर मिन्हासने एकट्याने 113 बॉलमध्ये 172 धावांची वादळी खेळी केली होती. या खेळीत त्याने 9 षटकार आणि 17 चौकार मारले आहेत. मिन्हास सोबत अहमद हुसेनने 56 धावांची खेळी केली. हे दोन्ही खेळाडू मैदानात पाकिस्तान 400 पार धावा करेल की काय?असे वाटत होते. त्यानंतर भारताच्या गोलंदाजांनी सामन्यात पुनरागमन करत शेवटच्या क्षणी 15 बॉलमध्ये 4 विकेट काढले होते.
