हे टी-20 नाही रणजी क्रिकेट
वैभव टी-20 प्रमाणेच रेड बॉल क्रिकेटमध्येही आक्रमक बॅटिंग करायचा प्रयत्न करत आहे. इंडिया ए कडून ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये यूथ टेस्ट खेळत असतानाही वैभवने अशाच प्रकारे बॅटिंगचा प्रयत्न केला, पण यात त्याला फार यश मिळालेलं नाही, त्यामुळे वैभवला टी-20 आणि रेड बॉल क्रिकेट वेगळं आहे, हे समजून घ्यावं लागेल, असं मत क्रिकेट तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.
advertisement
5 इनिंगमध्ये 50 रनही नाहीत
वैभव सूर्यवंशीने मोइनुल हक स्टेडियममध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटच्या 5 इनिंग खेळल्या आहेत, पण 5 इनिंग मिळून त्याला 50 रनही करता आलेल्या नाहीत. अरुणाचल प्रदेशविरुद्धच्या सामन्यात बॅटिंगला यायच्या आधी वैभवला 4 इनिंगमध्ये फक्त 31 रनच करता आल्या होत्या. यात तो दोनवेळा शून्य रनवर आऊट झाला. अरुणाचल प्रदेशविरुद्धच्या इनिंगचा स्कोअर मिळून वैभवने या मैदानात 5 इनिंगमध्ये 45 रन केले आहेत.
अरुणाचलचा 105 रनवर ऑलआऊट
या सामन्यात अरुणाचल प्रदेशचा पहिल्या इनिंगमध्ये 105 रनवर ऑलआऊट झाला. बिहारकडून फास्ट बॉलर शाकिब हुसैनने घातक बॉलिंग करत 6 विकेट घेतल्या. अरुणाचलचे 3 खेळाडू शून्य रनवर आऊट झाले. तर 4 बॅटरना दोन आकडी धावसंख्या करता आली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा बिहारचा स्कोअर 283/2 एवढा झाला आहे. आयुष लोहारुका 155 रनवर तर साकिबुल गानी 56 रनवर खेळत आहे.
वैभवच्या नावावर लाजिरवाणं रेकॉर्ड
नुकत्याच झालेल्या इंडिया ए च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात वैभव सूर्यवंशीच्या नावावर लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली. दुसऱ्या युथ टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये वैभव पहिल्याच बॉलवर आऊट झाला होता. यूथ टेस्टच्या चौथ्या इनिंगमध्ये दुसऱ्यांदा गोल्डन डकवर आऊट होणारा वैभव क्रिकेट इतिहासातला पहिला क्रिकेटपटू ठरला. याआधी याचवर्षी इंग्लंड दौऱ्यातल्या यूथ टेस्टमध्येही वैभव पहिल्याच बॉलला शून्य रनवर आऊट झाला होता.