TRENDING:

Vaibhav Suryavanshi VIDEO : 6,6,6,6,4,4..., वैभव सूर्यवंशीने बॅटीने चोपलं, बांग्लादेशच्या खेळाडूला 'नागिन डान्स' करायला लावला

Last Updated:

वैभव सूर्यवंशीची बॅट तळपली आहे. वैभव सूर्यवंशीने पहिल्याच ओव्हरमध्ये बांग्लादेशच्या गोलंदाजाची धुलाई करत एकाच ओव्हरमध्ये 19 धावा काढल्या होत्या.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
vaibhav Suryavanshi
vaibhav Suryavanshi
advertisement

India A vs Bangladesh A : एसीसी मेन्स रायझिंग स्टार आशिया कप स्पर्धेत आज भारत आणि बांग्लादेश यांच्यात सेमी फायनलचा सामना सूरू आहे. या सेमी फायनलच्या सामन्यात वैभव सूर्यवंशीची बॅट तळपली आहे. वैभव सूर्यवंशीने पहिल्याच ओव्हरमध्ये बांग्लादेशच्या गोलंदाजाची धुलाई करत एकाच ओव्हरमध्ये 19 धावा काढल्या होत्या. या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 316 च्या आसपास होता. यानंतर अशाचप्रकारे त्याने गोलंदाजांची धुलाई करत घाम फोडला आहे. 

advertisement

खरं तर सेमी फायनल सामन्यात प्रखम फलंदाजी करताना बांग्लादेशने 194 धावा ठोकल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना भारताकडून वैभव सूर्यवंशीने ताबडतोड सुरूवात केली होती. वैभव सूर्यवंशीने पहिल्या बॉलपासून प्रहार करायला सूरूवात केली होती.ज्यामुळे त्याने बांग्लादेशच्या रिपोन मोंडलच्या पहिल्याच ओव्हरमध्ये 19 धावा काढल्या होत्या. यावेळी वैभवने 2 गगनचुंबी षटकार आणि एक खणखणीत चौकार लगावला होता. वैभव सूर्यवंशीच्या या तुफान खेळीने भारताने डावाची सूरूवात वादळी झाली आहे.

advertisement

यानंतर वैभव सू्र्यवंशीने दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील त्याच वेगाने फलंदाजी आणि दोन खणखणीत षटकार मारले. त्यानंतर चौथ्या ओव्हरमध्ये वैभव सूर्यवंशी अब्दुल गफारच्या बॉलवर जिशान आलमच्या बॉलवर कॅचआऊट झाला आहे. वैभव सूर्यवंशीने या दरम्यान 15 बॉलमध्ये 38 धावांची खेळी केली होती.यावेळी वैभव सूर्यवंशीने 4 षटकार आणि 2 चौकार लगावले आहेत. या दरम्यान वैभव सूर्यवंशीचा स्ट्राईक रेट 253 होता. 

advertisement

वैभवनंतर नमनधीर 7 धावांवर बाद झाला आहे आणि प्रियांश आर्याने भारताचा डाव सावरला आहे.सध्या भारताने 100 धावांचा टप्पा ओलांडला आहे.

बांग्लादेशचा अ संघ हबीबुर रहमान सोहन, जिशान आलम,झवाद अबरार,अकबर अली (कर्णधार/विकेटकिपर), महिदुल इस्लाम अंकन, यासिर अली,एस एम मेहेरोब,अबू हैदर रोनी,रकीबुल हसन,अब्दुल गफ्फार सकलेन,रिपन मंडोल

advertisement

भारताचा अ संघ : प्रियांश आर्य, वैभव सूर्यवंशी,नमन धीर,नेहल वढेरा,जितेश शर्मा (कर्णधार/विकेटकिपर), हर्ष दुबे,आशुतोष शर्मा,रमणदीप सिंग,विजयकुमार वैशाक,गुरजपनीत सिंग,सुयश शर्मा

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
टाकाऊ पासून टिकाऊ, प्रदीप यांनी उभारला व्यवसाय, वर्षाला 2 कोटींची उलाढाल, Video
सर्व पहा

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Vaibhav Suryavanshi VIDEO : 6,6,6,6,4,4..., वैभव सूर्यवंशीने बॅटीने चोपलं, बांग्लादेशच्या खेळाडूला 'नागिन डान्स' करायला लावला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल