हनुमान गढी मंदिराला भेट
भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आणि त्याची पत्नी, अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी अयोध्या येथील हनुमान गढी मंदिराला भेट दिल्याची माहिती समोर येत आहे. हनुमान गढी मंदिर उत्तर प्रदेशातील एक महत्त्वाचे सांस्कृतिक आणि धार्मिक स्थळ आहे. एकेकाळी 'रन मशीन' म्हणून ओळखला जाणारा विराट, जो प्रत्येक विक्रमाचा पाठलाग करत होता, तो आता मंदिरात शांतपणे पूजा करताना दिसणे हे त्याच्या आयुष्यात एका नवीन टप्प्याचे संकेत देतं, असं काही जणांचं मत आहे.
advertisement
पाहा Video
यापूर्वी, त्यांना 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येतील राम मंदिराच्या 'प्राणप्रतिष्ठा' सोहळ्याचे आमंत्रणही मिळाले होते. त्यावेळी सचिनपासून धोनीपर्यंत सर्व खेळाडूंना हजेरी लावली होती. मात्र, विराट कोहली या सोहळ्याला उपस्थित राहू शकला नव्हता. त्यावेळी त्यांच्या उपस्थितीबद्दल काही चर्चा होत्या, परंतु आताच्या वृत्तानुसार, त्यांनी हनुमान गढी मंदिराला भेट दिल्याचं पहायला मिळतंय.