विराट कोहलीच्या व्यवस्थापन टीमकडून किंवा 'मेटा' कंपनीकडून अद्याप याबद्दल कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. विशेष म्हणजे, विराटचा भाऊ विकास कोहली याचे इंस्टाग्राम खाते देखील याच वेळी बंद झाल्याचे समोर आले आहे. यामुळे हा तांत्रिक बिघाड (Glitch) आहे की विराटने स्वतःहून सोशल मीडियापासून लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे, याबाबत चाहत्यांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे.
Twitter has changed the like button to
Virat Kohli's Instagram account is showing unavailable
Top to check #ViratKohli
विराटचे इंस्टाग्राम खाते बंद झाल्याने हवालदिल झालेल्या चाहत्यांनी आता त्याची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हिच्या सोशल मीडिया पोस्टवर प्रश्नांचा भडीमार सुरू केला आहे. "भाभी, भाई का अकाउंट कहां गया?" अशा कमेंट्स करत चाहते अनुष्काकडे विराटबद्दल विचारणा करत आहेत. अनुष्काने देखील अद्याप या विषयावर कोणतेही भाष्य केलेलं नाही.
दरम्यान, अनुष्का आणि विराट सध्या लंडनमध्ये असून तिथं ते कौटुंबिक वेळ घालवत आहेत. विराटने यापूर्वी एका मुलाखतीत सोशल मीडियामुळे ऊर्जा खर्च होत असल्याचे सांगत डिजिटल जगापासून दूर राहण्याचे संकेत दिले होते. तरीही 274 मिलियन फॉलोअर्स असलेल्या अशा मोठ्या खात्याचे अचानक गायब होणे क्रीडा जगतासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
