आयपीएल 2025 मध्ये विराट कोहलीच्या आरसीबीने पहिल्यांदाच ट्रॉफी जिंकली, पण या विजयाचा आनंद आरसीबीला फार तास घेता आला नाही. आरसीबीच्या विजयाच्या जल्लोषावेळी बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर चेंगराचेंगरी झाली, ज्यात 11 जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जणांना दुखापत झाली. या घटनेनंतर आरसीबीचे मालक टीम विकणार असल्याच्याची चर्चा सुरू झाल्या आहेत.
आयपीएल 2026 च्या मोसमासाठी येत्या काही महिन्यांमध्ये खेळाडूंचा लिलाव होणार आहे, त्याआधी प्रत्येक टीमला काही खेळाडूंना सोडावं लागणार आहे. यासाठी टीम मॅनेजमेंटने विराट कोहली आणि कर्णधार रजत पाटीदार यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक केली, या बैठकीत दोघांनीही तीन खेळाडूंना रिलीज करायला सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
advertisement
लियाम लिव्हिंगस्टोन
इंग्लंडच्या या ऑलराऊंडरकडून आरसीबीला आयपीएल 2025 च्या मोसमात बऱ्याच अपेक्षा होत्या, पण या मोसमात लिव्हिंगस्टोन बॅट आणि बॉलनेही अपयशी ठरला. लिव्हिंगस्टोनने 10 सामन्यांमध्ये एका अर्धशतकाच्या मदतीने 112 रन केले. आरसीबीने लिव्हिंगस्टोनला 10.75 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. आरसीबीकडून टीम डेव्हिडने खालच्या क्रमांकावर धमाकेदार कामगिरी केली, त्यामुळे लिव्हिंगस्टोनला आरसीबी रिलीज करण्याच्या तयारीत आहे.
यश दयाळ
महिलांकडून लैंगिक शोषणाचे आरोप झालेला डावखुरा फास्ट बॉलर यश दयाळ सध्या अडचणीत आहे. या आरोपांनंतर यश दयाळ मागच्या काही काळापासून क्रिकेटपासून दूर आहे, त्यामुळे त्याच्या भविष्याबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. मागच्या मोसमात यश दयाळने 15 सामन्यांमध्ये 9.59 च्या इकोनॉमी रेटने 13 विकेट घेतल्या. मैदानाबाहेरचे वाद आणि मैदानातली निराशाजनक कामगिरी यामुळे यश दयाळला आरसीबी टीमबाहेर करू शकते.
सुयश शर्मा
मिस्ट्री स्पिनर सुयश शर्माने आयपीएल 2025 मध्ये आरसीबीकडून 14 मॅच खेळल्या, पण त्याला या मोसमात प्रभाव पाडता आला नाही. 9 च्या इकोनॉमी रेटने सुयश शर्माने फक्त 8 विकेट घेतल्या, तसंच त्याची बॉलिंग सरासरीही तब्बल 55 ची होती. या कामगिरीमुळे आरसीबी सुयश शर्मालाही बाहेरचा रस्ता दाखवू शकते. विराटने टीम मॅनेजमेंटला एक चांगला रिस्ट स्पिनर शोधायलाही सांगितल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.
आयपीएल 2025 ची आरसीबीची टीम
रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, यश दयाळ, जॉस हेजलवूड, फिल सॉल्ट, जितेश शर्मा, लियाम लिव्हिंगस्टोन, रसिख दार, सुयश शर्मा, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, स्वप्निल सिंग, टीम डेव्हिड, रोमारिया शेफर्ड, नुवान तुषारा, मनोज भांडगे, जेकब बेथल, देवदत्त पडिक्कल, स्वस्तिक छिकारा, लुंगी एनगिडी, अभिनंदन सिंग, मोहित राठी