काय म्हणाला किंग कोहली?
कोहलीने आपल्या शारीरिक आणि मानसिक तयारीबद्दल बोलताना सांगितले की, शारीरिक कष्ट त्याच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनले आहे आणि आता त्याचा क्रिकेटशी थेट संबंध नाही. तो रोजच्या जीवनात अत्यंत हार्ड वर्क करतो. जोपर्यंत त्याचे फिटनेस लेव्हल्स आणि मानसिक शार्पनेस कायम आहे, तोपर्यंत मी कोणत्याही मॅचमध्ये चांगली परफॉर्म करू शकतो, असं विराट कोहलीने म्हटलं आहे. त्यावेळी त्याने टेस्ट क्रिकेटच्या कमबॅकवर मोठं वक्तव्य केलं.
advertisement
विराट कोहली पुन्हा टेस्ट मॅच खेळणार?
समालोचक हर्षा भोगले यांनी पोस्ट मॅच प्रेझेन्टेशनमध्ये विराटला एक प्रश्न विचारला. त्यावर विराटने स्पष्ट उत्तर दिलं. आता तू फक्त क्रिकेटच्या एका फॉरमॅटमध्ये खेळतोय, हे असंच राहणार आहे का? असा प्रश्न हर्षा भोगले यांनी विचारला. त्यावर विराटला भोगले यांच्या प्रश्नाचा नूर समजला. विराटने यावर लगेच उत्तर दिलं. होय, हे असंच राहणार आहे. मी फक्त क्रिकेटच्या एकाच फॉरमॅटमध्ये खेळणार आहे, असं विराट म्हणाला अन् खदकन हसला.
मी आता 37 वर्षांचा....
रांचीला लवकर येऊन पीचची कंडिशन समजून घेणे, दिवसा आणि रात्री बॅटिंगचा सराव करणे ही माझी तयारी होती. पण आता मी 37 वर्षांचा असल्यामुळे रिकव्हरीवर देखील लक्ष देणे आवश्यक असल्याचं विराट कोहली म्हणाला आहे. नेटमध्ये तासन्तास बॅटिंग करताना, जर त्याचे रिफ्लेक्सेस आणि शारीरिक क्षमता चांगली असेल, तर त्याला फॉर्मबद्दल काळजी करण्याची गरज वाटत नाही. त्याच्यासाठी सध्या, शारीरिकदृष्ट्या फिट असणे आणि मानसिकरित्या तयार असणे हेच महत्त्वाचे आहे, असं विराट कोहली म्हणाला आहे.
