विराटसोबत नक्की होतं तरी कोण?
शनिवारी पहाटे झालेल्या भस्म आरतीमध्ये विराट कोहलीसोबत गोलंदाज कुलदीप यादव आणि टीम इंडियाचे फील्डिंग कोच टी. दिलीप दिसून आले. अनुष्का शर्मा यावेळी सोबत नव्हती, मात्र विराट पूर्णपणे भक्तीत तल्लीन झालेला दिसला. जवळपास दोन तास विराटने भस्म आरतीचा अनुभव घेतला. कपाळावर भस्म आणि गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घातलेला विराटचा 'भक्त' अवतार सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय झाला आहे.
advertisement
गंभीर अन् राहुलनेही टेकवलं डोकं
केवळ विराटच नाही, तर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि फलंदाजी प्रशिक्षक सितांशु कोटक यांनीही महाकालाचे दर्शन घेतले. त्यांच्यासोबत केएल राहुल आणि संघातील इतर सदस्यांनीही बाबा महाकालाचा आशीर्वाद घेतला. मालिकेचा शेवटचा सामना इंदूरमध्ये असल्याने खेळाडूंनी शेजारीच असलेल्या उज्जैनला भेट देण्याची संधी सोडली नाही.
कुलदीपला वर्ल्ड कपचा विश्वास
दर्शनानंतर माध्यमांशी बोलताना कुलदीप यादव भावूक झाला होता. तो म्हणाला, "महाकालाच्या दर्शनाने खूप शांतता मिळाली. संपूर्ण टीम इथे आली होती. आगामी टी-२० वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया नक्कीच दमदार कामगिरी करेल." रोहित शर्मा आणि विराट कोहलीबद्दल बोलताना तो म्हणाला की, हे दोन्ही क्रिकेटचे दिग्गज आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमुळे संघात एक वेगळीच ऊर्जा मिळते.
नेहमी कॅमेऱ्यासमोर असणाऱ्या विराटने आज स्वतः कॅमेरा हातात घेतला होता. दर्शनानंतर मंदिराच्या प्रांगणात बसलेला असताना विराटने महाकालेश्वर मंदिराचे काही फोटो आपल्या मोबाईलमध्ये टिपले. नंदीच्या मूर्तीजवळ बसून शांतपणे ध्यान करतानाचा त्याचा फोटो चाहत्यांच्या मनाला स्पर्श करून जात आहे.
