रांची : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार विकेटकिपर इशान किशन सध्या भारतीय क्रिकेट संघाच्या बाहेर आहे. रणजी ट्रॉफीतही तो झारखंडच्या संघाकडून खेळत नाही आहे. यामुळे इशान किशन नेमका कुठे आहे, याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे. झारखंड संघाने रणजी ट्रॉफीच्या या मोसमात आतापर्यंत 3 सामने खेळले आहेत. चौथा सामना जमशेदपूरच्या कीनन स्टेडियमवर आज 2 फेब्रुवारीपासून खेळवला जाईल. या सामन्यातही इशान खेळणार नाही. किशनने दोन महिन्यांपूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताकडून शेवटचा क्रिकेट सामना खेळला होता.
advertisement
दरम्यान, काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की, आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या या फलंदाजाने बीसीसीआयकडून ब्रेक मागितला आहे. पण आता त्याचा ब्रेक बराच लांबल्याचे दिसत आहे. तो रणजीमध्येही खेळला नसताना चाहत्यांच्या मनात विविध प्रश्न निर्माण होत आहेत. या विषयावर रांचीचे क्रिकेट प्रशिक्षक असिफ यांनी लोकल18 शी बोलताना सांगितले की, इशान किशन हा खूप चांगला खेळाडू आहे. पण मानसिक थकवा आल्याने त्याने बीसीसीआयला काही दिवस ब्रेक घेण्याची विनंती केली आणि त्यालाही ब्रेक मिळाला. यानंतर तो दुबईला गेला आणि तिथे त्याने आपला क्वालिटी टाइम घालवला. यानंतर तिथून तो कौन बने करोडपतीमध्येही दिसला.
प्रशिक्षक आसिफ यांनी सांगितले की, यानंतर तो किती दिवस विश्रांती घेणार आणि कुठे आहे, हे सांगणे कठीण आहे. तो रांची आणि पाटण्यात नाही. तसेच त्याच्याशी कुणाचाही संपर्क होत नाही आहे. तर जेएससीएच्या अधिकाऱ्याने सांगितले की, इशान किशनसोबत कोणताही संपर्क नाही आणि तो रणजी संघात सामील होणार आहे की नाही याबद्दल त्यांच्याकडून कोणतीही माहिती आलेली नाही.
marriage : 2024 मध्ये यादिवशी वाजणार शहनाई, जाणून घ्या लग्नाचे शुभ मुहूर्त
राहुल द्रविड यांचेही ऐकले नाही -
प्रशिक्षक आसिफ यांनी सांगितले की, राहुल द्रविडनेही काही दिवसांपूर्वी इशान किशनला सांगितले होते की, आधी तू देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळ, आणि तुझा फिटनेस सिद्ध कर. त्यानंतरच तुझी टी-20 विश्वचषकासाठी निवड होईल. पण सध्याची परिस्थिती पाहता इशान किशनने राहुल द्रविडचेही ऐकले नाही, असे दिसते.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी इशान किशनने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर क्रिकेट सरावाचा व्हिडिओ पोस्ट केला होता. यानंतर त्याच्या चाहत्यांना वाटले होते की, कदाचित तो रणजी संघात खेळेल. पण मात्र, होऊ शकले नाही. सध्या तरी झारखंड क्रिकेट असोसिएशनसुद्धा इशान किशनबद्दल कोणतीही माहिती देऊ शकत नाही.
