marriage : 2024 मध्ये यादिवशी वाजणार शहनाई, जाणून घ्या लग्नाचे शुभ मुहूर्त
- Published by:Khushalkant Dusane
 - local18
 
Last Updated:
शुभ मुहूर्तांमुळे सध्या सर्वत्र तयारी दिसून येत आहे. टेंट विक्रेते, मिठाईवाले, बँडवाले, घोडीवाले या सर्वांचे वर्षभरासाठी बुकिंग झाले आहे. कोरोनाच्या प्रभावानंतर आता सर्वच व्यवसायांना वेग आला असून त्यामुळे त्याच्याशी संबंधित छोटे व्यापारीही उत्पन्न मिळवू लागले आहेत.
रवि पायक, प्रतिनिधी
भीलवाडा : भारतामध्ये शुभ आणि मंगलकार्य करताना शुभ मुहूर्त पाहिला जातो. जेव्हा काही चांगले कार्य केले जाते, ते कार्य चांगल्या पद्धतीने संपन्न व्हावे यासाठी हा एक दिवस निवडला जातो. त्यामुळे लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा क्षण असतो, यामुळे लोग लग्न कोणत्याही संकटाविना निर्विघ्न पार पाडू इच्छिता. यासाठी मग एक चांगला मुहूर्त पाहिला जातो.
advertisement
2024 या वर्षात 16 जानेवारीपासून मांगलिक कार्य सुरू झाले आहेत. जानेवारीनंतर आता फेब्रुवारीमध्ये लग्न-विवाह सोहळ्याचे 20 शुभू मुहूर्त आहेत. लीप वर्ष असल्याने फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस आहेत. 29 तारखेला या महिन्यातला शेवटचा शुभू मुहूर्त आहे. यामध्ये फक्त 9 दिवस सोडून प्रत्येक दिवश शुभ मुहूर्त आहे. म्हणजे वर्षातील सर्वाधिक शुभ मुहूर्त फेब्रुवारी महिन्यात आहेत. मे, जून आणि ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात तर विवाहाचे मुहूर्तच नाही. संपूर्ण वर्षभरात एकूण 77 शुभ मुहूर्त आहेत.
advertisement
2024 मधील शुभ मुहूर्त - 
भीलवाडा सहित संपूर्ण देशात 2024 च्या शुभ कार्यांना सुरुवात झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात सर्वाधिक 20 शुभ मुहूर्त आहेत. फेब्रुवारी महिन्यात 1 ते 8, 12, 13, 14, 17, 18, 19, 23 ते 27 आणि 29 पर्यंत शुभ मुहूर्त असतील. तसेच मार्च महिन्यात 1 ते 7 आणि 11, 12 पर्यंत तसेच एप्रिलमध्ये 18 ते 22, जुलै महिन्यात 3 आणि 9 ते 15 पर्यंत, नोव्हेंबरमध्ये 16 ते 18 आणि 22 ते 26 पर्यंत आणि डिसेंबर महिन्यात 2 ते 5, 9 ते 13 आणि 14, 15 पर्यं लग्नसोहळ्याचे शुभ मुहूर्त राहणार आहेत.
advertisement
शुभ मुहूर्तांमुळे सध्या सर्वत्र तयारी दिसून येत आहे. टेंट विक्रेते, मिठाईवाले, बँडवाले, घोडीवाले या सर्वांचे वर्षभरासाठी बुकिंग झाले आहे. कोरोनाच्या प्रभावानंतर आता सर्वच व्यवसायांना वेग आला असून त्यामुळे त्याच्याशी संबंधित छोटे व्यापारीही उत्पन्न मिळवू लागले आहेत.
हे वर्ष स्पेशल -
view comments2024 हे वर्ष लीप वर्ष आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिना 29 दिवसांचा असणार आहे. ही अशी वेळ आहे जेव्हा 4 वर्षात फेब्रुवारी महिन्यात 29 तारीख येते आणि यामुळे लग्नाचा विशेष शुभ मुहूर्त आहे. म्हणून असल्याने लोकांमध्ये हा दिवस खूप खास मानला जात आहे. प्रत्येकजण या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो आणि लग्नाच्या निमित्ताने 29 फेब्रुवारीचे वेगळे महत्त्व आणि क्रेझ पाहायला मिळत असते.
Location :
Bhilwara,Rajasthan
First Published :
February 02, 2024 8:21 AM IST


