Pune Mhada : खुशखबर! 90 लाखांची म्हाडची घर फक्त 28 लाखांत; नेमकं कुठे? अर्ज भरण्याची अंतिम तारीख पाहा
Last Updated:
MHADA Lottery 2025 : पुणे म्हाडा लॉटरी 2025 अंतर्गत घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी मोठी संधी आली आहे. तब्बल 90 लाखांच्या घरांची किंमत फक्त 28 लाखांवर उपलब्ध आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख व संपूर्ण माहिती जाणून घ्या.
पुणे : पुणे किंवा पुण्यासारख्या मोठ्या शहरात स्वतःचं घर असावं असं बऱ्याचजणांचे स्वप्न असतं. मात्र, वाढत्या महागाईमुळे हे स्वप्न अनेकदा पूर्ण होऊ शकत नाही. पण आता म्हाडा हे सर्वसामान्यांच हे स्वप्न पूर्ण करणार आहे. नेमकं पुणे शहरात कुठे आणि किती लाखांना म्हाडाची घर मिळत आहेत या बाबत सविस्तर जाणून घेऊयात.
पुण्यातील 'या' प्राईम लोकेशनवर आहेत म्हाडाची घर...
पुण्यातील वाकड परिसरात केवळ 28 लाख रुपयांत घर मिळू शकतं. ऐकून विश्वास बसणार नाही, पण ही ऑफर अगदी खरी आहे. यश्विन अर्बो सेंट्रो या नावाने ओळखला जाणारा हा प्रीमियम हाऊसिंग प्रोजेक्ट वाकडमधील भूमकर चौकाजवळ, इंदिरा गांधी कॉलेजच्या परिसरात आणि हायवे टच लोकेशनवर उभारला जात आहे. सुप्रसिद्ध विलास जावळकर ग्रुप या प्रकल्पाचा विकास करत आहे.
advertisement
या प्रकल्पात घर विक्रेत्याला 2 BHK आणि 3 BHK अशा दोन्ही प्रकारातील आकर्षक फ्लॅट्स उपलब्ध आहेत. त्यापैकी 28 घरे खास म्हाडा लॉटरी योजनेसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. म्हणजेच पुण्यातल्या प्राईम लोकेशनवर वाजवी दरात घर घेण्याची ही एकदम योग्य संधी आहे.
या प्रकल्पातील म्हाडा योजनेअंतर्गत मिळणाऱ्या फ्लॅट्सचा कार्पेट एरिया सुमारे 500 ते 600 स्क्वेअर फूट आहे. त्यांची किंमत 28.42 लाख ते 28.74 लाख रुपये दरम्यान ठेवण्यात आली आहे. याच परिसरातील इतर प्रकल्पांमधील समान फ्लॅट्ससाठी तब्बल 80 ते 90 लाख रुपये मोजावे लागतात. त्यामुळे फक्त 28 लाखांत इतक्या उत्तम लोकेशनवर घर मिळणं हे खरोखरच म्हाडाची सुवर्णसंधी म्हणता येईल.
advertisement
अर्ज करण्याची प्रक्रिया कोणती?
अर्ज प्रक्रिया देखील अतिशय सोपी आहे. इच्छुकांनी म्हाडाच्या अधिकृत वेबसाइटवर https://lottery.mhada.gov.in
भेट द्यावी. येथे ''Pune Board Lottery 2025'' हा विभाग निवडल्यानंतर 'Yashwin Urbo Centro, Wakad' हा प्रकल्प दिसेल. त्यानंतर ऑनलाइन नोंदणी, अर्ज भरणे, कागदपत्रे अपलोड करणे आणि फी भरने या सर्व प्रक्रिया एकाच ठिकाणी पूर्ण करता येतात. ही प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल आहे, त्यामुळे ती मोबाइल किंवा कॉम्प्युटरवरून सहज पूर्ण करता येते शिवाय या घरासाठी 20 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता.
advertisement
एकंदरीत पाहता पुण्यासारख्या प्राईम लोकेशनमध्ये 90 लाखांचा फ्लॅट फक्त 28 लाखांत घेण्याची ही सर्व सामान्यांसाठी अतिशय फायदेशीर संधी आहे. म्हाडा लॉटरीद्वारे घर घेऊ इच्छिणाऱ्यांनी ही संधी हातातून जाऊ देऊ नये.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 01, 2025 12:02 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Mhada : खुशखबर! 90 लाखांची म्हाडची घर फक्त 28 लाखांत; नेमकं कुठे? अर्ज भरण्याची अंतिम तारीख पाहा


