फिल्मीबीटच्या वृत्तानुसार मेरी डिकोस्टा ही एक कोरिओग्राफर आहे. स्मृती आणि पलाशच्या लग्न सोहळ्यातले डान्स बसवण्याची जबाबदारी मेरी डिकोस्टाकडे असल्याचा दावाही सोशल मीडियावर करण्यात येत आहे. मेरी डिकोस्टाचे नाव हे सोशल मीडियावर काही स्क्रीनशॉट्स व्हायरल झाल्यानंतर समोर आलं. स्क्रीनशॉटमधलं हे संभाषण पलाश आणि मेरी डिकोस्टा यांच्यातलं असल्याचा दावा केला गेला. या कथित चॅट्समध्ये पलाश त्याचं रिलेशनशीप लॉन्ग डिस्टन्स आणि अलमोस्ट डेड असल्याचं सांगत आहे, पण या चॅट्सबद्दल न्यूज 18 कोणतीही अधिकृत पुष्टी करत नाही.
advertisement
लग्नाआधीच्या सोहळ्यांमध्ये हे कथित चॅट्स समोर आले आणि स्मृतीच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला, अशा अफवाही पसरवल्या गेल्या, पण यातला कोणताही दावा खरा आहे का खोटा? हे स्पष्ट झालं नाही. तसंच चॅट्सचे स्क्रीनशॉट शेअर करणारा मूळ थ्रेडही रेडिटवरून हटवला गेला आहे.
आतापर्यंत दोन्ही बाजूच्या कुटुंबांनी स्मृतीच्या वडिलांची प्रकृती बिघडल्यामुळे लग्न पुढे ढकलण्यात आल्याचं स्पष्ट केलं आहे. हृदयविकाराच्या झटक्यानंतर स्मृतीच्या वडिलांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, यानंतर दोन दिवसांनी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर दुसरीकडे पलाशची प्रकृतीही बिघडल्यामुळे त्याला मुंबईच्या रुग्णालयात दाखल केले गेले. स्मृती किंवा पलाशच्या कुटुंबाने व्हायरल झालेल्या या स्क्रीनशॉट्सबद्दल अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
