17 फोर आणि 9 सिक्स
एसीसी अंडर 19 आशिया कप 2025 च्या अंतिम लढतीत पाकिस्तानच्या समीर मिन्हासने भारतीय बॉलर्सची दाणादाण उडवली. त्याने अवघ्या 113 बॉल्समध्ये 172 रन्सची ऐतिहासिक खेळी साकारली. या खेळीत त्याने 17 फोर आणि 9 सिक्स मारत मैदानाचे चारही कोपरे व्यापून टाकले होते. भारतीय कॅप्टन आयुष म्हात्रेने टॉस जिंकून प्रथम बॉलिंग करण्याचा घेतलेला निर्णय या खेळीमुळे काही काळ चुकीचा वाटू लागला होता.
advertisement
दोन महत्त्वाचे कॅच सुटले
या मॅचमध्ये भारतीय फिल्डर्सकडून दोन महत्त्वाचे कॅच सुटले, ज्याचा फायदा पाकिस्तानला मिळाला. हमजा जहूरला 4 रन्सवर आणि उस्मान खानला 32 रन्सवर जीवनदान मिळाले. मात्र, समीर मिन्हासने एका बाजूने फटकेबाजी सुरूच ठेवत पाकिस्तानचा स्कोअर 300 च्या पार नेला. समीर हा मुल्तानचा असून त्याचा मोठा भाऊ अराफात मिन्हास याने देखील पाकिस्तानसाठी आंतरराष्ट्रीय टी-20 मॅचेस खेळल्या आहेत.
कोण आहे पाकिस्तानी समीर मिन्हास?
दरम्यान, पाकिस्तानमधील मुल्तानमध्ये राहणारा समीर मिन्हास याला लहानपणापासून क्रिकेटचं वेड होतं. मुल्तानचा रहिवासी असलेला समीर मिनहास हा पाकिस्तानी अंडर-19 संघाचा उजव्या हाताचा स्फोटक सलामीवीर बॅटर आहे जो लेग ब्रेक देखील बॉलिंग करतो. 2 डिसेंबर 2006 रोजी जन्मलेला समीर मिनहासचा मोठा भाऊ अराफत मिनहास 2024 च्या अंडर-19 विश्वचषकात पाकिस्तानी संघाचा भाग होता. समीर मिनहासचा मोठा भाऊ अराफत मिनहासनेही पाकिस्तानसाठी चार टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या काळात अराफत मिनहासने चार विकेट घेतल्या आणि 25 धावा केल्या.
