TRENDING:

2 वर्ल्ड कप जिंकणारा आता होणार भारतीय क्रिकेटचा बॉस! BCCI च्या अध्यक्षपदी सरप्राईजिंग नावाची एन्ट्री

Last Updated:

काही दिवसांपूर्वी सचिन तेंडुलकर याचं नाव बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी जोडलं जात होतं, पण स्वत: सचिन तेंडुलकरने हे वृत्त फेटाळून लावलं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : काही दिवसांपूर्वी सचिन तेंडुलकर याचं नाव बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी जोडलं जात होतं, पण स्वत: सचिन तेंडुलकरने हे वृत्त फेटाळून लावलं, त्यानंतर आता भारताचा माजी ऑफ स्पिनर हरभजन सिंग याचं नाव बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी जोडलं जात आहे. सचिनने अध्यक्षपदाचं वृत्त फेटाळलं असलं तरी हरभजनने मात्र अद्याप यावर स्पष्टीकरण दिलेलं नाही, त्यामुळे या चर्चांना उधाण आलं आहे.
2 वर्ल्ड कप जिंकणारा आता होणार भारतीय क्रिकेटचा बॉस! BCCI च्या अध्यक्षपदी सरप्राईजिंग नावाची एन्ट्री
2 वर्ल्ड कप जिंकणारा आता होणार भारतीय क्रिकेटचा बॉस! BCCI च्या अध्यक्षपदी सरप्राईजिंग नावाची एन्ट्री
advertisement

पंजाब क्रिकेट असोसिएशनने हरभजन सिंगचे नामांकन दिल्याचं वृत्त क्रिकबझने दिलं आहे. 45 वर्षांच्या हरभजन सिंगने भारताकडून 367 आंतरराष्ट्रीय मॅच खेळल्या आहेत. हरभजनचं नामांकन अधिकृतरित्या दाखल झाल्यानंतरच याबाबतचं चित्र स्पष्ट होणार आहे, कारण फक्त राज्य संघटनेचे समर्थन असलेले उमेदवारच निवडणूक लढवू शकतात. हरभजन सिंग हा 2007 टी-20 वर्ल्ड कप आणि 2011 वनडे वर्ल्ड कपच्या विजेत्या भारतीय टीमचा भाग होता.

advertisement

बीसीसीआयमध्ये मागच्या काही काळापासून माजी क्रिकेटपटू हे अध्यक्ष राहिले. सगळ्यात आधी सौरव गांगुली आणि त्यानंतर रॉजर बिन्नी यांनी ही जबाबदारी पार पाडली. क्रिकबझने याबाबत हरभजन सिंगसोबत बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्याने प्रतिसाद दिला नाही. बीसीसीआयचे निवडणूक अधिकारी ए.के. जोती यांच्या मते, नामांकनाची वेळ 20 ते 21 सप्टेंबर दरम्यान आहे, तसंच 28 सप्टेंबर रोजी निवडणुका होणार आहेत.

advertisement

अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, संयुक्त सचिव आणि कोषाध्यक्ष या पदांसाठी निवडणुका होतील. बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेतील अलीकडील कल पाहता, या पदांसाठी निवडणुका होण्याची शक्यता कमी दिसते. विद्यमान सदस्य देवजित सैकिया, प्रभतेज सिंग भाटिया आणि रोहन देसाई हे अनुक्रमे सचिव, कोषाध्यक्ष आणि संयुक्त सचिव म्हणून कायम राहतील अशी अपेक्षा आहे.

निवडणुकीच्या वेळापत्रकानुसार, शुक्रवारी (12 सप्टेंबर) राज्य संघटनांसाठी त्यांच्या संबंधित प्रतिनिधींची नावे सादर करण्याचा शेवटचा दिवस होता, जे वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहतील आणि आवश्यकता असल्यास मतदान करतील. यादी शनिवारी (13 सप्टेंबर) जाहीर होण्याची अपेक्षा आहे.

advertisement

20 आणि 21 सप्टेंबर रोजी नामांकन दाखल झाल्यानंतर, 22 सप्टेंबर रोजी छाननी होईल. उमेदवारांना 23 सप्टेंबर रोजी त्यांचे नामांकन मागे घेण्याची परवानगी दिली जाईल, त्यानंतर उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाईल. निवडणूक आणि मतमोजणी 28 सप्टेंबर रोजी होणार आहे.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
2 वर्ल्ड कप जिंकणारा आता होणार भारतीय क्रिकेटचा बॉस! BCCI च्या अध्यक्षपदी सरप्राईजिंग नावाची एन्ट्री
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल