TRENDING:

IND vs SA : कोणी हरवायची हिंमत करत नव्हतं, तिथेच लोटांगण, टीम इंडियाच्या वस्त्रहरणाची 3 कारणं!

Last Updated:

गौतम गंभीर टीम इंडियाचा प्रशिक्षक झाल्यापासून टीम इंडियाने 6 टेस्ट सीरिज खेळल्या आहेत, त्यातल्या तीन सीरिज भारताने गमावल्या तर दोन सीरिज जिंकल्या आणि एक सीरिज ड्रॉ झाली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : गौतम गंभीर टीम इंडियाचा प्रशिक्षक झाल्यापासून टीम इंडियाने 6 टेस्ट सीरिज खेळल्या आहेत, त्यातल्या तीन सीरिज भारताने गमावल्या तर दोन सीरिज जिंकल्या आणि एक सीरिज ड्रॉ झाली. मागच्या वर्षी न्यूझीलंडने टीम इंडियाचा भारतामध्ये 3-0 ने आणि आता दक्षिण आफ्रिकेने 2-0 ने पराभव केला आहे. एकेकाळी घरच्या मैदानात टीम इंडियाचा सीरिज तर सोडाच पण मॅचमध्येही पराभव करण्याची कुणाची हिंमत नव्हती, पण आता एका वर्षामध्ये दोन देशांनी टीम इंडियाचा घरच्या मैदानात व्हाईट वॉश करून पराभव केला आहे. 2023 च्या मध्यापर्यंत भारतीय टीम टेस्ट क्रिकेटमध्ये नंबर वन टीम होती. विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडिया टेस्ट क्रमवारीमध्ये अव्वल झाली, पण आता सातत्याने टीमची कामगिरी खालावत चालली आहे.
कोणी हरवायची हिंमत करत नव्हतं, तिथेच लोटांगण, टीम इंडियाच्या वस्त्रहरणाची 3 कारणं!
कोणी हरवायची हिंमत करत नव्हतं, तिथेच लोटांगण, टीम इंडियाच्या वस्त्रहरणाची 3 कारणं!
advertisement

1 ऑलराऊंडरना खेळवण्याची आत्मघातकीपणा

गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक झाल्यापासून जास्त बॅटर घेऊन खेळण्याची रणनीती सुरू झाली, ज्यामुळे टीम इंडिया आठव्या आणि नवव्या क्रमांकापर्यंत ऑलराऊंडर घेऊन खेळते, पण यामुळे टीमची बॉलिंग कमकुवत होत आहे. याआधी टीममध्ये 6 बॅटर आणि 5 बॉलर घेऊन मैदानात उतरायची. गुवाहाटी टेस्टमध्ये भारतीय टीममध्ये रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर आणि नितीश कुमार रेड्डी हे 3 ऑलराऊंडर होते. रेड्डी आणि सुंदर हे बॉलिंग आणि बॅटिंगमध्ये स्वत:ला सिद्ध करू शकले नाहीत. या दोघांच्या ऐवजी स्पेशलिस्ट बॅटर किंवा स्पेशलिस्ट बॉलर घेऊन टीम इंडिया खेळली असती, तर कदाचित सीरिजचा निकाल वेगळा लागला असता. टेस्ट मॅच जिंकण्यासाठी तुम्हाला 20 विकेट घेणाऱ्या बॉलर्सची गरज असते, पण मागच्या काही काळात टीम इंडियाची रणनीती याच्याबरोबर उलटी राहिली आहे.

advertisement

2 आयपीएल कामगिरीवर टीममध्ये निवड

मागच्या काही काळात आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना टीम इंडियामध्ये संधी मिळाली आहे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे हर्षित राणा. हर्षित राणाकडे फक्त 14 प्रथम श्रेणी आणि 27 लिस्ट ए सामन्यांचा अनुभव आहे. मागच्या दोन आयपीएलमध्ये केकेआरसाठी खेळताना हर्षितने 34 विकेट घेतल्या आहेत. हार्दिक पांड्याचा पर्याय म्हणून नितीश रेड्डी तर अश्विनचा पर्याय म्हणून वॉशिंग्टन सुंदरकडे पाहिलं जातं, पण या दोघांनाही त्यांचा नावाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही.

advertisement

3 बॅटिंग क्रमवारीमध्ये बदल

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
वाहन ब्लॅकलिस्ट टाळायचंय? काय होतात त्याचे परिणाम? संपूर्ण माहितीचा Video
सर्व पहा

प्रत्येक टेस्टमध्ये टीम इंडियाच्या बॅटिंग क्रमवारीमध्ये बदल होत आहेत. खासकरून तिसऱ्या क्रमांकाचं स्थान अजूनही निश्चित झालेलं नाही. वॉशिंग्टन सुंदर पहिल्या टेस्टमध्ये तिसऱ्या क्रमांकावर खेळला, तर साई सुदर्शनला बेंचवर बसवण्यात आलं. पण दुसऱ्या टेस्टमध्ये साई सुदर्शन तिसऱ्या आणि सुंदर आठव्या क्रमांकावर बॅटिंगला आला. टेस्ट क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकाच स्थान फार महत्त्वाचं असतं. याआधी चेतेश्वर पुजारा आणि राहुल द्रविड यांच्यासारखे दिग्गज खेळाडू तिसऱ्या क्रमांकावर खेळले, पण आता टीम इंडियाताला तिसरा क्रमांक हा संगीत खूर्चीचा खेळ झाला आहे. दुसरीकडे टी-20 क्रिकेटमध्येही संजू सॅमसनसोबतही अशीच परिस्थिती निर्माण झाली. संजूने ओपनर म्हणून टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये 3 शतकं झळकावली होती, पण त्यानंतर संजूला खालच्या क्रमांकावर बॅटिंगला पाठवण्यात आलं आणि नंतर त्याला टीममधूनही बाहेर जावं लागलं.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SA : कोणी हरवायची हिंमत करत नव्हतं, तिथेच लोटांगण, टीम इंडियाच्या वस्त्रहरणाची 3 कारणं!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल