ही घटना घडल्यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी लगेचच SOS नोटिफिकेशन पाठवलं. सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. सुरक्षा अधिकारी डॅनी सिमन्स यांच्या तक्रारीनंतर एमआयजी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला, यानंतर आरोपी अकील खान याला अटक करण्यात आली आहे. अकील खान याच्याविरोधात आधीही अनेक गुन्हे दाखल असल्याची माहितीही समोर आली आहे.
advertisement
ऑस्ट्रेलियाच्या महिला खेळाडूंसोबत घडलेली ही घटना दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्याआधी झाली आहे. हा सामना शनिवार 25 ऑक्टोबरला इंदूरच्या होळकर स्टेडियममध्ये होणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या टीम आधीच सेमी फायनलला पोहोचल्या आहेत, पण या सामन्यात विजय मिळवणारी टीम पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर राहिल आणि भारताविरुद्ध सेमी फायनलचा सामना खेळेल. ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि भारत या चार टीम सेमी फायनलला पोहोचल्या आहेत.
ऑस्ट्रेलियाची टीम
फोएबे लीचफिल्ड, जॉर्जिया वॉल, एलिसा पेरी, बेथ मुनी, एनाबेल सदरलँड, एश्ले गार्डनर, ताहलिया मॅकग्रा, सोपी मोलिनक्स, अलाना किंग, किम गर्थ, मेगन शूट, हीदर ग्राहम, जॉर्जिया वेयरहॅम, डार्सी ब्राऊन
दक्षिण आफ्रिकेची टीम
लॉरा वोलवॉर्ड, ताजमिन ब्रिटस्, सुने लुस, एनेरी डर्कसन, मारिजाने कॅप, काराबो मेसो, क्लो ट्रायोन, नादिन डिक्लर्क, नोंडुमिसो शंगासे, नॉनकुलुलेको म्लाबा, अयाबोंगा खाका, मसाबाता क्लास, एनेके बॉश, तुमी सेखुखुने, सिनालो जाफ्ता
