दुसरीकडे भारताचा पराभव करून इंग्लंडची टीम सेमी फायनलसाठी क्वालिफाय झाली आहे. तर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या आधीच सेमी फायनलमध्ये पोहोचल्या आहेत, त्यामुळे आता एका जागेसाठी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात रेस आहे. टीम इंडिया सेमी फायनलला पोहोचणार का नाही? हे गुरूवारी ठरणार आहे, कारण भारत आणि न्यूझीलंड यांच्यात गुरूवारी नवी मुंबईच्या डी.वाय.पाटील स्टेडियममध्ये सामना होणार आहे. टीम इंडियासाठी दिलासादायक बाब म्हणजे न्यूझीलंडचा फॉर्म, न्यूझीलंडला स्पर्धेत 5 पैकी फक्त 1 मॅच जिंकता आली आहे, तर त्यांनी 2 सामने गमावले असून त्यांचे 2 सामने पावसामुळे रद्द झाले आहेत.
advertisement
इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाचा 4 रननी पराभव झाला असला, तरीही भारतीय टीम अजूनही सेमी फायनलच्या रेसमध्ये कायम आहे. सेमी फायनलला पोहोचण्यासाठी टीम इंडियाला त्यांच्या उरलेल्या दोन पैकी किमान एक सामना जिंकावा लागणार आहे. न्यूझीलंडनंतर भारतीय टीम 26 ऑक्टोबरला बांगलादेशविरुद्ध खेळणार आहे.
टीम इंडियाची कामगिरी
2025 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने श्रीलंकेचा 59 रननी पराभव करून स्पर्धेला दणक्यात सुरूवात केली होती. दीप्ती शर्माने 53 रनची खेळी केली आणि त्यानंतर 3 विकेटही घेतल्या, त्यामुळे तिला प्लेअर ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं. यानंतर भारताने पाकिस्तानचा 88 रननी पराभव केला, पण भारताला दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि आता इंग्लंडविरुद्ध धक्का बसला आहे.