हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 30 ऑक्टोबर रोजी पावसाची 80 टक्के शक्यता आहे. जर त्या दिवशी सामना खेळवता आला नाही, तर सामना राखीव दिवसात म्हणजेच दुसऱ्या दिवशी होईल. या स्पर्धेसाठी आयसीसीच्या खेळण्याच्या अटींनुसार, "सेमीफायनल आणि फायनलसाठी एक राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. नियोजित दिवशी अपूर्ण सामना सुरू ठेवला जाईल. इतर कोणत्याही सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात येणार नाही."
advertisement
अंपायर पहिल्या नियोजित दिवशी निकाल निश्चित करण्यासाठी प्रयत्न करतील, जरी त्यासाठी ओव्हर कमी करावी लागली तरी. पण, जर या दिवशी निकाल लागला नाही, तर राखीव दिवशी सामना जिथे सोडला होता तिथूनच पुन्हा सुरू होईल. निकालासाठी दोन्ही टीमनी किमान 20 ओव्हर खेळणे महत्वाचे आहे. सेमी फायनलसाठी अतिरिक्त 120 मिनिटे राखीव ठेवण्यात आली आहेत.
जर 30 ऑक्टोबर रोजी पावसामुळे व्यत्यय आला आणि सामना पूर्ण झाला नाही किंवा सुरू होऊ शकला नाही, तर 31 ऑक्टोबरच्या राखीव दिवशी सामना पूर्ण केला जाईल. पण, राखीव दिवशीही पावसामुळे सामना झाला नाही तर मॅच रद्द केले जाईल. या परिस्थितीमध्ये पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर असणारी टीम फायनलमध्ये प्रवेश करेल. म्हणजेच सामना पावसामुळे रद्द झाला तर भारताचं स्वप्न भंगेल आणि ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप फायनलमध्ये प्रवेश करेल.
सेमी फायनलमधील विजेती टीम फायनलमध्ये दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यातल्या विजेत्या टीमसोबत खेळेल. वर्ल्ड कपच्या सेमी फायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात फिल्डिंग करत असताना ओपनर प्रतिका रावलला दुखापत झाली, त्यामुळे ती स्पर्धेतून बाहेर झाली आहे. प्रतिकाच्या ऐवजी शफाली वर्माची टीम इंडियात निवड करण्यात आली आहे. तर दुसरीकडे एलिसा हिलीच्या दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाची चिंताही वाढली आहे.
भारतीय टीम
हरमनप्रीत कौर, स्मृती मंधाना, उमा छेत्री, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, जेमिमा रोड्रिग्ज, रेणुका सिंग ठाकूर, अरुंधती रेड्डी, ऋचा घोष, क्रांती गौड, अमनजोत कौर, राधा यादव, श्री चरणी, शफाली वर्मा, स्नेह राणा
ऑस्ट्रेलियन टीम
एलिसा हिली, ताहलिया मॅकग्रा, डार्सी ब्राऊन, एशले गार्डनर, किम गर्थ, हीथर ग्राहम, अलाना किंग, फोएबे लिचफील्ड, सोफी मोलिनक्स, बेथ मुनी, एलिसे पेरी, मेगन शुट्ट, एनाबेल सदरलँड, जॉर्जिया वोल, जॉर्जिया वेयरहॅम
