शिखा पांडे एअरफोर्सची विंग कमांडर
फास्ट बॉलर असलेली शिखा पांडे एअरफोर्समध्ये विंग कमांडर आहे. शिखाने गोवा इंजिनिअरिंग कॉलेजमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये बी.टेक पूर्ण केले आणि 2011 ती मध्ये भारतीय हवाई दलात कमिशन झाली. सध्या ती विंग कमांडर आहे आणि हैदराबाद आणि जोधपूर येथे तैनात आहे. शिखा पांडेचा जन्म 12 मे 1989 रोजी आंध्र प्रदेशात झाला होता, पण तिचे शिक्षण गोव्यात झाले. शिखा पांडेचे बालपण गरिबीत गेले. तिचे वडील एक लहान व्यापारी होते आणि कुटुंबाची आर्थिक परिस्थिती वाईट होती. पण, शिखाला क्रिकेटची आवड होती. ती प्लास्टिकच्या बॉलनी सराव करायची आणि सराव करण्यासाठी दररोज 40 किमी सायकल चालवायची.
advertisement
शिखा पांडेची कारकीर्द
36 वर्षीय अनुभवी फास्ट बॉलर असलेल्या शिखाने 62 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 43 विकेट्स घेतल्या आहेत, ज्यात तिने 6.4 च्या इकॉनॉमी रेटने रन दिल्या आहेत. महिला प्रीमियर लीगमध्ये, शिखा पांडेने 27 सामन्यांमध्ये 30 विकेट्स घेतल्या आहेत, ज्यात तिने 7 पेक्षा कमीच्या इकॉनॉमी रेटने बॉलिंग केली आहे. शिखा पांडेची शिस्त आणि अनुभव तिला एक उच्च दर्जाची खेळाडू बनवतो. म्हणूनच तिने महिला प्रीमियर लीगमध्ये इतके लक्ष वेधले.
