TRENDING:

एक आणखी फायनल मुंबईच्या बाहेर, जिथे 6 वर्ष मॅचच झाली नाही,गुजरातच्या 'त्या' मैदानाला FINAL चा मान

Last Updated:

विशेष म्हणजे जिथे 6 वर्ष भारताचा एकही आंतरराष्ट्रीय सामना पार पडला नाही, त्या गुजरातच्या मैदानाला आता फायनलचा मान देण्यात आला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
WPL Final : क्रिकेटचा फायनल सामना म्हटलं तर अनेकांना तो मुंबईच्या वानखेडे स्टेडिअयममध्ये व्हावा अशी इच्छा असते. पण गेल्या काही वर्षापासून अनेक स्पर्धांमध्ये फायनलचा सामना मुंबईच्या मैदानावर पारच पडला नाही आहे.याऐवजी दुसऱ्या एका स्टेडियममध्ये फायनल खेळवण्यात आली आहे.त्यामुळे गेल्या काही वर्षापासून वानखेडेच्या बाबतीत असचं घडलं आहे.त्यात आता भर म्हणून आणखी एक फायनल सामना मुंबईबाहेर गेला आहे. विशेष म्हणजे जिथे 6 वर्ष भारताचा एकही आंतरराष्ट्रीय सामना पार पडला नाही, त्या गुजरातच्या मैदानाला आता फायनलचा मान देण्यात आला आहे.
wpl 2026
wpl 2026
advertisement

खरं तर फायनल म्हटलं तर अनेक सामने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवले जातात,असे अनेकांचा आरोप आहे.पण या वेळेस नरेंद्र मोदी स्टेडियम ऐवजी बडोदरा क्रिकेट असोसिएशनच्या रिलायस्न स्टेडिअमवर सामना रंगणार आहे. विशेष म्हणजे या स्टेडियमवर गेल्या 6 वर्षात एकही सामना पार पडला नाही आहे. त्यामुळे बडोदराच्या मैदानाला मान दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

advertisement

पहिला सामना कुठे रंगणार?

वुमेन्स प्रिमियर लीग 2026च्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये वुमेन्स प्रिमियर लीगचा पहिला सामना हा 9 जानेवारी 2026 ला नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. तर 5 तारखेला वडोदरा येथे फायनल खेळवला जाणार आहे.

यावेळी वेळापत्रकात मोठा बदल झाला आहे. साधारणपणे फेब्रुवारी-मार्च कालावधीत होणारा WPL, ७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या पुरुषांच्या T20 विश्वचषकामुळे एक महिना आधीच हलवण्यात आला आहे. संघर्ष टाळण्यासाठी आणि खेळाडूंना पुरेसा तयारीचा वेळ देण्यासाठी, WPL जानेवारीच्या विंडोमध्ये हलवण्यात आला आहे.

advertisement

WPL चे अध्यक्ष जयेश जॉर्ज यांनी नवी दिल्ली येथे झालेल्या लिलावादरम्यान या बदलाची औपचारिक घोषणा केली. ते म्हणाले, "आगामी हंगाम नवी मुंबईत खेळवला जाईल आणि अंतिम सामना वडोदरा येथे होईल." ही घोषणा केवळ नवीन यजमानाबद्दल उत्साह वाढवत नाही तर लीगच्या धोरणात्मक नियोजनाचे प्रतिबिंब देखील दर्शवते.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मका दराची घसरगुंडी कायम, सोयाबीन आणि कांद्याला आज काय मिळाला भाव?
सर्व पहा

लीग पुन्हा एकदा कारवां मॉडेल वापरून खेळवली जाईल. स्पर्धेचा पहिला टप्पा डीवाय पाटील स्टेडियममध्ये होईल, जिथे भारताने या महिन्याच्या सुरुवातीला महिला एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. त्यानंतरचे सामने वडोदरा येथे होतील आणि अंतिम सामना 5 फेब्रुवारी रोजी होईल, असे त्यांना जाहीर केले.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
एक आणखी फायनल मुंबईच्या बाहेर, जिथे 6 वर्ष मॅचच झाली नाही,गुजरातच्या 'त्या' मैदानाला FINAL चा मान
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल