TRENDING:

WPL Auction : मुंबईचा मोठा डाव, रोहितच्या विक्रम मोडणाऱ्याला संधी, पर्स 5.75 उरले असताना 3 कोटी मोजले, कोण आहे ती?

Last Updated:

वुमेन्स प्रिमियर लीगच्या मिनी ऑक्शनला नवी दिल्लीत सूरूवात झाली आहे. या लिलावात मुंबई इंडियन्सने मोठा डाव खेळला आहे. मुंबईने इंडियन्सने टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्माचा विक्रम मोडणाऱ्या खेळाडूला संघात घेतलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
WPL Auction 2025 : वुमेन्स प्रिमियर लीगच्या मिनी ऑक्शनला नवी दिल्लीत सूरूवात झाली आहे. या लिलावात मुंबई इंडियन्सने मोठा डाव खेळला आहे. मुंबईने इंडियन्सने टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्माचा विक्रम मोडणाऱ्या खेळाडूला संघात घेतलं आहे. विशेष म्हणजे मुंबईच्या पर्समध्ये 5.75कोटी उरले असताना त्यांनी एकाच खेळाडूवर 3 कोटी मोजले आहे.त्यामुळे ही खेळाडू नेमकी कोण आहे? हे जाणून घेऊयात.
mumbai indians amelia kerr
mumbai indians amelia kerr
advertisement

खरं तर ही खेळाडू दुसरी तिसरी कुणी नसून न्यूझीलंडची अष्टपैलू खेळाडू अमेलिया केर आहे.मेगा लिलावापूर्वी मुंबई इंडियन्सने केरला संघातून रिलीज केले होते. 25 वर्षीय केर 2023 आणि 2025 मध्ये WPL विजेतेपद पटकावलेल्या मुंबई इंडियन्सच्या संघाचा भाग होती.पण आता लिलावपूर्वी तिला रिलीज करण्यात आले होते,पण आजच्या लिलावात मुंबईने इंडियन्सने तिला 3 कोटी रूपयांना ताफ्यात घेतलं आहे.

advertisement

अमेलिया केर ही न्यूझीलंडची क्रिकेटपटू असून ती सध्या वेलिंग्टन आणि न्यूझीलंडकडून खेळते. महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक करणारी ती सर्वांत तरुण महिला क्रिकेटपटू आहे.त्यामुळेच तिने रोहित शर्माचा डबल सेंच्यूरीचा रेकॉर्ड मोडल्याचे बोलले जात आहे. तसेच महिलांच्या एकदिवसीय सामन्यातील सर्वाधिक वैयक्तिक धावा करण्याचा विक्रमही तिच्या नावावर आहे.

अमेलिया केर हिचा 2024 च्या महिला T20 वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडला पहिल्यांदाच विजेतेपद मिळवून देण्यात तिचा मोठा वाटा होता. त्या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरीमुळे तिला ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ म्हणून गौरवण्यात आले.

advertisement

डबल सेंच्यूरी करणारी तरूण खेळाडू

अमेलिया केरने 13 जून 2018 रोजी महिलांच्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. आयर्लंडविरुद्ध नाबाद 232 धावा करत महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक करणारी सर्वांत तरुण क्रिकेटपटू (पुरुष वा महिला) ठरली. हे द्विशतक एकदिवसीय क्रिकेटमधील (पुरुष व महिला मिळून) तिसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचे प्रदर्शन होते. न्यूझीलंडच्या खेळाडूकडून केलेल्या सर्वोच्च धावसंख्यांपैकी ते दुसऱ्या क्रमांकावर होते आणि महिलांच्या एकदिवसीय सामन्यांतील सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या म्हणून नोंदले गेले. विशेष म्हणजे, याच सामन्यात तिने 17 धावांत 5 बळी घेत आपला पहिला WODI पाच बळींचा पराक्रमही साकारला.

advertisement

WPL मधील कामगिरी

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मका दराची घसरगुंडी कायम, सोयाबीन आणि कांद्याला आज काय मिळाला भाव?
सर्व पहा

तीन WPL हंगामात 29 सामन्यांमध्ये अमेलिया केरने 437 धावा केल्या आहेत आणि 40 विकेट्स घेतल्या आहेत.गेल्या हंगामात तिने 18विकेट्ससह पर्पल कॅप जिंकली होती.आंतरराष्ट्रीय स्तरावर, केरने गेल्या वर्षी न्यूझीलंडसह T20 विश्वचषक जिंकला.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
WPL Auction : मुंबईचा मोठा डाव, रोहितच्या विक्रम मोडणाऱ्याला संधी, पर्स 5.75 उरले असताना 3 कोटी मोजले, कोण आहे ती?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल