मुलाला दिग्गज आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू बनवलेले योगराज सिंग आयुष्यात अपयशी पती आणि वडील ठरले. योगराज सिंग यांचं पहिलं लग्न शबनम कौर यांच्याशी झालं, ज्या लग्नाआधी मुस्लिम होत्या. शबनम मॉर्डन विचाराच्या तर योगराज सिंग तापट स्वभावाचे होते, त्यामुळे अनेकवेळा दोघांमध्ये भांडणं व्हायची. शबनम आणि योगराज यांना दोन मुलं झाली, यातल्या मोठ्याचं नाव युवराज तर छोटा जोरावर.
advertisement
योगराज सिंग यांची दुसरी पत्नी नीना बुंदेल
युवराज आणि जोरावर लहान असतानाच योगराज आणि शबनम यांचा घटस्फोट झाला. यानंतर युवराज आणि जोरावर आई शबनमसोबत राहायला लागले. शबनमसोबत घटस्फोट घेतल्यानंतर योगराज सिंग यांनी 90 च्या दशकातली पंजाबी अभिनेत्री नीना बुंदेलसोबत लग्न केलं. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर योगराज फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करायला लागले.
जोरावर सिंग आणि व्हिक्टर सिंग
फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत असतानाच योगराज नीनाच्या जवळ आले आणि दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. लग्नानंतर नीना योगराज सिंग यांच्यासोबत अमेरिकेला गेल्या, त्यामुळे त्यांचं फिल्म करिअरही संपलं. अमेरिकेमध्ये स्थायिक झाल्यानंतर नीना कुटुंबाची देखभाल करायला लागल्या.
अमरजोत कौर
नीना बुंदेल यांनी पंजाबी चित्रपटांसोबतच म्युझिल अल्बमध्येही काम केलं आहे. नीना बुंदेल आणि योगराज सिंग यांना दोन मुलं आहेत. मुलगा व्हिक्टर फिल्म इंडस्ट्रीमध्ये अपयशी ठरल्यानंतर आता क्रिकेट अकॅडमी चालवत आहे तर मुलगी अमरजोत कौर रॅकेट प्लेअर आहे. अमरजोत कौर आधी टेनिस खेळायची, पण काहीच दिवसांपूर्वी तिने पॅडल गेममध्ये भारताचं प्रतिनिधीत्व (एशिया पॅसिफिक पॅडल कप) केलं, या स्पर्धेसाठी ती मलेशियाला गेली होती. अमरजोत कौरचं टोपणनाव एमी आहे. युवराज सिंगचं त्याच्या सावत्र बहिण-भावांसोबत चांगलं बॉन्डिंग आहे.
