नेपाळचा बॅटर दीपेंद्र सिंह याने 27 सप्टेंबर 2023 ला मंगोलियाविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 9 बॉलमध्ये अर्धशतक करून युवराजचं रेकॉर्ड मोडलं. यानंतर त्याच वर्षी 17 ऑक्टोबरला भारताच्या आशुतोष सिंगने सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीमध्ये 11 बॉलमध्ये अर्धशतक ठोकलं. दीपेंद्र आणि आशुतोष यांनी मिळून त्यांच्या ऐतिहासिक इनिंगमध्ये एकूण 16 सिक्स मारल्या, ज्या युवराजपेक्षा जास्त होत्या. या दोघांनी 22 बॉलमध्ये तब्बल 105 रन काढले.
advertisement
दीपेंद्र सिंगने एशियन गेम्स 2023 मध्ये नेपाळकडून खेळताना मंगोलियाविरुद्ध पाचव्या क्रमांकावर बॅटिंगला उतरून 10 बॉलमध्ये 52 रनची खेळी केली. 9 बॉलमध्ये अर्धशतक करून दीपेंद्र सिंगने युवराजचं 16 वर्ष अबाधित राहिलेलं रेकॉर्ड मोडलं. दीपेंद्रने 520 च्या स्ट्राईक रेटने हे रन केले, ज्यात 6 सिक्स आणि 6 फोरचा समावेश होता. ही विश्वविक्रमी खेळी करून दीपेंद्र नॉटआऊट पॅव्हेलियनमध्ये आला.
या सामन्यात नेपाळने 20 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावून 314 रन केले. या आव्हानाचा पाठलाग करताना मंगोलियाला फक्त 41 रन करता आल्या. दीपेंद्रने त्याच्या टी-20 आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये 90 सामन्यांमध्ये 139.11 च्या स्ट्राईक रेटने 1956 रन केले, ज्यात एक शतक आणि 10 अर्धशतकांचा समावेश आहे.
आशुतोषच्या 12 बॉलमध्ये 53 रन
भारताच्या आशुतोष शर्माने सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीमध्ये 12 बॉलमध्ये नाबाद 53 रन करून धमाका केला. आशुतोषने अरुणाचल प्रदेशिविरुद्ध ही वादळी खेळी केली. आशुतोष बॅटिंगला आला तेव्हा 5 ओव्हरचा खेळ शिल्लक होता, यानंतर त्याने 8 सिक्स आणि एक फोरच्या मदतीने युवराजचं रेकॉर्ड उद्ध्वस्त केलं. आशुतोषने बाऊंड्री मारूनच 52 रन केले, ज्यात त्याचा स्ट्राईक रेट 442 होता.
आशुतोष शर्माचं करिअर
आशुतोषच्या या वादळी खेळीमुळे रेल्वेने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 246 रन केले. रेल्वेचा कर्णधार उपेंद्र यादवने 51 बॉलमध्ये नाबाद 103 रनची खेळी केली, ज्यात 9 सिक्स आणि 6 फोरचा समावेश होता. या आव्हानाचा पाठलाग करताना अरुणाचल प्रदेशचा 18.1 ओव्हरमध्ये 119 रनवर ऑलआऊट झाला, त्यामुळे रेल्वेचा 127 रननी विजय झाला. आशुतोषने त्याच्या टी-20 करिअरमध्ये 47 सामन्यांमध्ये 976 रन केले, ज्यात 8 अर्धशतकं आहेत.
