4 वर्षांचा प्लॅन तयार केला
युवराज सिंगच्या मार्गदर्शनाखाली अभिषेकने आपली फलंदाजी आणि मानसिक ताकद कमालीची सुधारली आहे. युवीने सांगितलं की, "आम्ही त्याच्यासाठी 4 वर्षांचा प्लॅन तयार केला होता. जर त्याने काही ठराविक गोष्टींचे काटेकोरपणे पालन केलं, तर त्याचे टॅलेंट त्याला भारतीय स्तरापर्यंत नक्कीच घेऊन जाईल, असा मला विश्वास होता." विशेष म्हणजे, युवराजच्या या मार्गदर्शनानंतर बरोबर 4 वर्षे आणि 3 महिन्यांत अभिषेकने भारतीय जर्सी घातली.
advertisement
चार वर्ष तीन महिन्यानंतर अभिषेक टीम इंडियामध्ये
युवराजने सानिया मिर्झाला दिलेल्या मुलाखतीत अनेक गोष्टींचा खुलासा केला. शुभमन आणि अभिषेकला तयार करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापराव्या लागल्या. शुभमन गिल ऑलरेडी टीम इंडियामध्ये खेळत होता. त्यावेळी मी चार वर्षांचा वेळ दिला होता. त्यानंतर बरोबर चार वर्ष तीन महिन्यानंतर अभिषेक टीम इंडियामध्ये सिलेक्ट झाला, असं युवराज सिंगने म्हटलं आहे.
तुला देशासाठी मॅचेस जिंकून द्यायच्यात
दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात युवराजने अभिषेक, शुभमन गिल आणि इतर तरुण खेळाडूंसाठी विशेष सराव शिबिरांचे आयोजन केले होते. "मी तुला देशासाठी मॅचेस जिंकून देण्यासाठी तयार करत आहे, हे लिहून ठेव," असे प्रेरणादायी शब्द युवराजने त्यावेळी अभिषेकला म्हटले होते, जे आता सत्यात उतरले आहेत.
