मोठी प्राइज कट
नथिंगचा हा मिड-बजेट फोन तीन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला होता – 8GB RAM + 128GB, 8GB RAM + 256GB आणि 12GB RAM + 256GB. याची सुरुवातीची किंमत 25,999 रुपये आहे. आता हा फोन 22,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध आहे. त्याच वेळी, त्याचे इतर दोन्ही व्हेरिएंट देखील 3,000 रुपयांनी स्वस्त लिस्ट केले गेले आहेत. Nothing Phone (2a) चा 256GB व्हेरिएंट 24,999 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. याशिवाय 1,500 रुपयांपर्यंत बँक डिस्काउंटही मिळणार आहे.
advertisement
Samsung च्या नव्या Flip फोनचे फीचर्स लीक! पहा नव्या फोनमध्ये काय मिळू शकतं
Nothing Phone (2a) चे फीचर्स
नथिंगच्या या मिड-बजेट फोनमध्ये 6.7 इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले आहे. फोनचा डिस्प्ले 120Hz हाय रिफ्रेश रेट फीचरला सपोर्ट करतो. याशिवाय फोनच्या डिस्प्लेला कॉर्निंग गोरिल्ला ग्लासचे प्रोटेक्शन देखील असेल.
या फोनमध्ये MediaTek Dimensity 7200 Pro प्रोसेसर आहे. जो 12GB रॅम आणि 256GB पर्यंत इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करेल. हा फोन Android 14 वर बेस्ड Nothing OS वर काम करतो.
Googleने आणलंय भारी फीचर! मोबाईल चोरांची होईल फजिती, असं करा ऑन
यात 5,000mAh च्या दमदार बॅटरीसह 45W USB टाइप C फास्ट चार्जिंग फीचर देखील आहे. ड्युअल बँड WiFi व्यतिरिक्त यात कनेक्टिव्हिटीसाठी 5G, 4G, LTE, ब्लूटूथ, NFC सारखे फीचर्स असतील.
या स्मार्टफोनच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. फोनमध्ये 50MP मुख्य OIS आणि 50MP अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा असेल. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात 32MP फ्रंट कॅमेरा असेल.
