Googleने आणलंय भारी फीचर! मोबाईल चोरांची होईल फजिती, असं करा ऑन
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Google Identity Check Feature: गुगलने आपल्या लाखो Android यूझर्ससाठी आणखी एक आश्चर्यकारक फीचर आणले आहे. जे फोन चोरीला गेल्यास तुमच्या डिव्हाइसमधील डेटा सुरक्षित ठेवेल. चला त्याबद्दल जाणून घेऊया...
Smartphone Tips And Tricks: Google Android स्मार्टफोन यूझर्ससाठी सतत नवीन सिक्योरिटी फीचर्स आणत आहे. त्याच वेळी, अलीकडेच कंपनीने यूझर्सची सिक्योरिटी अधिक मजबूत करण्यासाठी आणखी एक नवीन बायोमेट्रिक-बेस्ड फीचर सादर केले आहे. ज्याला कंपनीने “Identity Check” असे नाव दिले आहे. फोन चोरीला गेल्यास यूजर्सचा डेटा आणि प्रायव्हसी सुरक्षित ठेवण्यासाठी हे फिचर तयार करण्यात आले आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया...
या डिव्हाइसवर उपलब्ध आहेत फीचर
आयडेंटिटी चेक फीचर सध्या फक्त Android 15 वर चालणाऱ्या Pixel आणि Samsung Galaxy डिव्हाइसवर उपलब्ध आहे. तुमचा फोन अनलॉक झाला असेल किंवा पासवर्डशी छेडछाड झाली असेल तरीही चोरीच्या घटनांमध्ये चोरांना स्मार्टफोनवरील डिजिटल अकाऊंट्स आणि सेटिंग्जमध्ये प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी हे फीचर तयार करण्यात आले आहे, असे कंपनीचे म्हणणे आहे.
advertisement
हे फीचर एवढे खास का आहे?
बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन: नवीन फीचर ऑन केल्यानंतर, यूझर्सना काही सेन्सिटिव्ह अकाउंट आणि डिव्हाइस सेटिंग्जमध्ये प्रवेश करण्यासाठी बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन पूर्ण करावे लागेल.
ट्रस्टेड लोकेशन्स: फीचर त्या लोकेशन्सवर डिपेंड करते ज्यांना यूझर्स ट्रस्टेड लोकेशन्समध्ये सेट करतात. जसं की, घर किंवा ऑफिस.
advertisement
Safety Measures: हे फीचर ऑन असताना, बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनशिवाय, चोर डिव्हाइसचा पिन कोड बदलू शकत नाहीत आणि “Find My Device” किंवा सिक्योरिटी फीचर्स बंद करू शकत नाहीत. खरतंर, आयडेंटिटी चेक फक्त क्लास 3 बायोमेट्रिक्सला सपोर्ट करणाऱ्या उपकरणांवर उपलब्ध आहे.
advertisement
फोन फक्त 72 तासांनंतर उघडेल
Google म्हणते की हे फीचर केवळ अल्ट्रासोनिक किंवा ऑप्टिकल इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि 3D फेस रेकग्निशन असलेल्या डिव्हाइसला समर्थन देईल. तर, 72 तासांनंतर, पिन, पासकोड किंवा पॅटर्न यांसारख्या प्राथमिक प्रमाणीकरणाद्वारे डिव्हाइसमध्ये प्रवेश केला जाऊ शकतो. याआधी, गुगलने "ऑफलाइन डिव्हाइस लॉक" नावाचे एक आश्चर्यकारक फीचर देखील सादर केले होते.
advertisement
आता Identity Check फीचर असेही चालू करा
- तुमच्या फोनच्या सेटिंगमध्ये जा.
- सेटिंग्जमध्ये Security & Privacy किंवा Biometric & Password ऑप्शनवर क्लिक करा.
- खाली स्क्रोल करा आणि Identity Check फीचर निवडा.
- फीचर चालू करण्यापूर्वी तुमच्या डिव्हाइसवर फिंगरप्रिंट किंवा फेस अनलॉक बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन सेट करा.
- ट्रस्टेड लोकेशन्स ऑप्शनवर जा आणि तुमचे घर, ऑफिस यासारखी सुरक्षित ठिकाणे अॅड करा.
advertisement
- Enable Identity Check चा ऑप्शन निवडा आणि तो चालू केल्यानंतर इंस्ट्रक्शंस फॉलो करा.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 27, 2025 5:29 PM IST


