The Family Man 3 Review : 4 वर्षांनी कायम आहे श्रीकांत तिवारीचा दरारा, 'द फॅमिली मॅन 3' पाहण्याआधी वाचा रिव्ह्यू

Last Updated:

The Family Man 3 Review : मनोज तिवारी यांच्या बहुचर्चित 'द फॅमिली मॅन 3'चा बहुप्रतीक्षित सीझन अखेर प्राईम व्हिडीओवर रिलीज झाला आहे. चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आलेला हा तिसरा सीझन खूपच मनोरंजक आहे.

News18
News18
The Family Man 3 Review by Pratik Shekhar : मनोज तिवारी अभिनीत 'फॅमिली मॅन'चा पहिला सीझन 2019 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. हा पहिला सीझन प्रचंड हिट ठरला. त्यानंतर दोन वर्षांनी राज अँड डीके यांनी दुसरा सीझन आणला. पहिल्याप्रणाणेच दुसरा सीझनही तेवढाच दमदार होता... यात अजिबात शंका नाही. पण तिसऱ्या सीझनसाठी मात्र खूप प्रतीक्षा करावी लागली आहे. अखेर आता चार वर्षांनंतर 'फॅमिली मॅन' आपल्या तिसऱ्या सीझनसह परतला आहे. 'द फॅमिली मॅन सीझन 3' 21 नोव्हेंबर 2025 रोजी प्राईम व्हिडीओवर रिलीज झाला आहे.
'द फॅमिली मॅन सीझन 3'चा ट्रेलर पाहिल्यापासूनच या सीरिजबद्दलची माझी उत्सुकता वाढली होती. पुन्हा एकदा श्रीकांत तिवारीच्या भूमिकेत मनोज बाजपेयी OTT गाजवणार याची मला खात्री होती. तिसऱ्या सीझनमध्ये मनोज बाजपेयीसह जयदीप अहलावतही मन जिंकून घेण्यात यशस्वी ठरलाय. दोघांचाही अभिनय जबरदस्त आहे. श्रीकांत तिवारीच्या भूमिकेत मनोज बाजपेयीला पाहणं ही एक वेगळीच अनुभूती आहे.
advertisement
'द फॅमिली मॅन 3'ची कथा मागील दोन्ही सीझनपेक्षा अधिक चांगली आहे. पण खरं सांगायचं झालं तर तिसरा सीझन थोडा संथ आहे. या सीझन 3 मध्ये एकूण सात एपिसोड आहेत. पहिल्या ते तिसऱ्या एपिसोडमध्येच खूप संथपणा जाणवतो. त्यामुळे सुरुवातीलाच कंटाळा येऊ शकतो. पहिले तीन एपिसोड खूपच संथ आहेत. त्यामुळे ते पाहताना कथानक लवकर पुढे सरकावं असं सारखं वाटत राहतं. मात्र तिसऱ्या एपिसोडनंतर कथानक वेगाने पुढे सरकतं आणि आपली उत्सुकता वाढते.
advertisement
'द फॅमिली मॅन सीझन 3'ची सुरुवात नॉर्थईस्टमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांपासून होते. त्यानंतर लगेचच सीन श्रीकांतकडे वळतो. श्रीकांत आपल्या नव्या घरात गृहप्रवेश करत असतात. हे घर त्यांची पत्नी सुचित्रा तिवारी (प्रियमणी) यांनी नुकतंच विकत घेतलेलं आहे. तर दुसरीकडे श्रीकांत आणि त्यांच्या पत्नीमध्ये वाद सुरू आहे. त्यांनी घटस्फोटासाठी अर्जही दाखल केला आहे. अशातच श्रीकांतला आपला बॉस गौतम कुलकर्णी (दलीप ताहिल) यांच्यासोबत खास मिशनसाठी नॉर्थईस्टला जावे लागते. या मिशनदरम्यान त्यांच्यावर हल्ला होतो. ज्यात गौतम कुलर्णी यांचा मृत्यू होतो तर श्रीकांत मात्र वाचतो. इथेच कथानकात खरा ट्विस्ट येतो. श्रीकांतच्या अडचणी वाढू लागतात. त्याच्या कुटुंबावरही संकट येते.
advertisement
श्रीकांतवर संकट आलेलं असताना त्याचे सहकारी त्याला सोडून जात नाहीत आणि शेवटपर्यंत त्याच्या सोबत राहून त्याला मदत करतात. शेवटी श्रीकांत कोणत्या अडचणीत अडकतो आणि त्याचेच डिपार्टमेंट त्याचा शत्रू का बनते? त्याचा पत्नीशी खरंच घटस्फोट होतो का? असे अनेक प्रश्न आहेत. ज्यांची उत्तरं तुम्हाला संपूर्ण सीरीज पाहिल्यानंतरच मिळतील.
फॅमिली मॅन सीझन 3 ची कथा चांगली आहे. फक्त सुरुवातीच्या तीन एपिसोडमधील संथपणा कमी करायला हवा होता. या एपिसोड्समध्ये गती असती तर हा सीझन आधीच्या दोन सीझनपेक्षा अधिक दमदार ठरला असता.
advertisement
अभिनयाबद्दल बोलायचं झालं तर मनोज तिवारींसोबतच जयदीप अहलावत यांनी ड्रग डीलर रुक्मा यांच्या भूमिकेत जबरदस्त काम केलं आहे. निमरत कौर, प्रियमणी, शारिब हाश्मी, जुगल हंसराज आणि श्रेया धनवंतर यांनीही आपल्या भूमिकांमध्ये उत्तम कामगिरी केली आहे. माझ्याकडून 'फॅमिली मॅन सीझन 3' ला 5 पैकी 2.5 स्टार.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
The Family Man 3 Review : 4 वर्षांनी कायम आहे श्रीकांत तिवारीचा दरारा, 'द फॅमिली मॅन 3' पाहण्याआधी वाचा रिव्ह्यू
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement