पुण्यात धक्कादायक प्रकार! राजगुरुनगरमध्ये नगरसेवक पदासाठी 1 कोटींचा लिलाव? सगळेच मूग गिळून गप्प, चाललंय काय?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Rajgurunagar Corporator Post Auction : नगरसेवकपदासाठी पाच लाखाच्या आसपास खर्चाची मर्यादा आहे, अशातच पुरुषांच्या जागेसाठी 1 कोटी 3 लाखांची बोली लागली.
Pune Rajgurunagar Municipal Election (सचिन तोडकर, प्रतिनिधी) : पुण्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत धक्कादायक प्रकार घडल्याची चर्चा आहे. राजगुरुनगर नगरपरिषदेच्या नगरसेवकपदाच्या जागेसाठी चक्क लिलाव झाल्याचं बोललं जातंय. एका प्रभागात पुरुषांच्या जागेसाठी 1 कोटी 3 लाखांची बोली लागली असून महिलांच्या जागेसाठी 22 लाखांची बोली लागल्याची चर्चा राजगुरुनगरमध्ये जोरदार सुरु झाली आहे.
तेरी भी चूप ओर मेरी भी चूप
मात्र, सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही ही मूग गिळून गप्प आहेत. आपापसात साटेलोटे झाल्यानं, 'तेरी भी चूप ओर मेरी भी चूप' अशी भूमिका घेतल्याची जोरदार चर्चा आहे. बोलीतील रकमेतून शहराचा विकास करायचं असं ही एकमुखी निर्णय झाल्याचं बोललं जातंय. पण हे कोणत्या प्रभागात घडलं अन ते उमेदवार कोण? याबाबतची वाच्यता कोणीचं करत नाहीये. या प्रकारामुळे लोकशाही जिवतं आहे का? असा प्रश्न राजगुरूनगरमध्ये विचारला जात आहे.
advertisement
1 कोटी 3 लाखांची बोली
आज निवडणूक बिनविरोध घेण्याचा शेवटचा दिवस आहे. अशात कोण-कोण माघार घेणार अन् जे माघार घेतात त्याचं प्रभागात ही बोली लागली का? याबाबत तर्क-वितर्क लावले जाणार हे उघड आहे. मात्र नगरसेवकपदासाठी पाच लाखाच्या आसपास खर्चाची मर्यादा आहे, अशातच जर पुरुषांच्या जागेसाठी 1 कोटी 3 लाख आणि महिलांच्या जागेसाठी 22 लाखांची बोली लागेल असेल तर मग राज्य निवडणूक आयोग याबाबत काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
advertisement
पहिली जागा बिनविरोध
शिंदे शिवसेना पुर्ण ताकदीने राजगुरुनगर नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या मैदानात उतरली असुन भाजप,राष्ट्रवादी कॉग्रेस अजित पवार, शिवसेना उबाठा,आणि शिंदे गटाची शिवसेना असे चारही पक्षांची चौरंगी लढत होत आहे. यात शिंदे शिवसेनेत नुकतेच दाखल झालेल्या अतुल देशमुख व शिंदे सेनेच्या इतर नेत्यांनी डावपेच टाकत राजगुरुनगर नगरपरिषदेची पहिली जागा बिनविरोध करण्यात यश मिळवले आहे.
advertisement
निवडणूकच बिनविरोध करण्याचा निर्णय
दरम्यान, भविष्यात निवडणुकांमधील पदांसाठी असा लिलाव होऊ लागला तर ही नवी प्रथा पडण्याची भीती आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाला यासंबंधात पाऊल उचलावं लागणार आहे. स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रभागात अनेक इच्छुक उमेदवार मैदानात उतरणार होते. त्यामुळे खर्च वाढणार आणि प्रभागात फूट पडू शकते, असे म्हणत गावकऱ्यांनी निवडणूकच बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला. राजकीय नेते यापैकी कोणीही खुलेपणाने भूमिका न घेतल्याने साटेलोटे झाल्याच्या चर्चा आणखीच रंगत आहेत.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
November 21, 2025 12:16 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुण्यात धक्कादायक प्रकार! राजगुरुनगरमध्ये नगरसेवक पदासाठी 1 कोटींचा लिलाव? सगळेच मूग गिळून गप्प, चाललंय काय?


