PSI चं ट्रेनिंग पूर्ण झाल्याची पोस्ट अन् 24 तासांत..., आता तुरुंगात जाण्याची वेळ, काय घडलं?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Ravi Shivaji Shikare
Last Updated:
सोशल मीडियावर पोलीस उपनिरीक्षक पदाचं ट्रेनिंग पूर्ण केल्याची पोस्ट केल्यानंतर 24 तासांतच तुरुंगात जाण्याची वेळ परभणीच्या तरुणावर आली आहे.
छत्रपती संभाजीनगर: अंगावर खाकी वर्दी चढवण्यासाठी अनेकजण जीवाचं रान करत असतात; पण एखादी चूक भारी पडते आणि कमावलेलं सगळं गमावण्याची वेळ येते. असाच काहीसा प्रकार परभणीतील एकासोबत घडला आहे. पीएसआयचं ट्रेनिंग पूर्ण झाल्याची पोस्ट सोशल मीडियावर केली आणि 24 तासांत नशीब पालटलं. मैत्रिणीच्या बलात्कार आणि ॲट्रॉसिटीच्या तक्रारीनंतर भागवत ज्ञानोबा मुलगीर याच्यावर तुरुंगात जाण्याची वेळ आली आहे.
परभणीचा भागवत मुलगीर याने नुकतेच पोलीस उपनिरीक्षक पदासाठीचे ट्रेनिंग पूर्ण केले. त्यानंतर समाजमाध्यमांवर पोलीस उपनिरीक्षक होत असल्याची पोस्ट टाकली. तसेच विद्यार्थ्यांनी तयारी कशी करावी या अनुषंगानेही एक पोस्ट केली. मात्र, त्याचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यावर काही तासांतच 25 वर्षीय मैत्रिणीने बलात्कार आणि ॲट्रॉसिटीची केस दाखल केली.
advertisement
आधीही मिळवलं यश
अभ्यासात नेहमीच अव्वल असणाऱ्या भागवतने आधी राज्य उत्पादन शुल्क (एसटीआय) परीक्षेत चमकदार यश मिळवले होते. त्यानंतर पोलीस विभागात करिअर करण्याचे स्वप्न ठरवत पीएसआय भरतीतही बाजी मारली. परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या अनुभवातून मार्गदर्शन करण्यासाठी तो विविध समाज माध्यमांवर सक्रिय होता.
गुन्ह्याच्या आरोपांमुळे कारकीर्द संकटात..?
इन्स्टाग्राम व फेसबुकवर त्याचे 2.75 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. स्पर्धा परीक्षांबाबतचे टिप्स, प्रेरणादायी पोस्टमुळे तरुणांमध्ये त्याची लोकप्रियता झपाट्याने वाढली; पण त्याच समाज माध्यमांवर प्रसिद्धी मिळवत असताना त्याच्या खासगी आयुष्यातील वादामुळे त्याला अडचणींचा सामना करावा लागत आहे. मैत्रिणीने पोलिसांकडे तक्रार दाखल करताच, पीएसआय प्रशिक्षणाच्या उंबरठ्यावर असलेल्या भागवतवर कारवाईची वेळ आली आणि त्याचे करिअर धोक्यात आले आहे.
advertisement
तक्रार काय?
लग्नाची आमिष दाखवत मुलगीर याने 24 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी क्रांती चौक परिसरातील एका कॅफेमध्ये तरुणीवर अत्याचार केले. त्यानंतर तिला गर्भधारणा झाली, तेव्हा आरोपी मुलगीरने तिच्यावर गर्भपात करण्यासाठी दबाव टाकला आणि तिला त्यासाठी भाग पाडले, असे तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, गुन्हा दाखल होताच आरोपी भागवत मुलगीर याला नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकादमी येथून अटक करण्यात आली. त्याला छत्रपती संभाजीनगर येथे न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
view commentsLocation :
Aurangabad,Maharashtra
First Published :
November 21, 2025 12:36 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
PSI चं ट्रेनिंग पूर्ण झाल्याची पोस्ट अन् 24 तासांत..., आता तुरुंगात जाण्याची वेळ, काय घडलं?


