फ्लिपकार्ट द्वारे जारी मायक्रोसाइटनुसार, रिपब्लिक डे सेल 17 जानेवारी 2026 पासून सर्वच ग्राहकांसाठी सुरु होईल. खरंतर फ्लिपकार्ट प्लस आणि व्हीआयपी सब्सक्राइबर्ससाठी कंपनीने विशेष सुविधा दिली आहे. या मेंबर्सला सेलचा 'अर्ली अॅक्सेस' मिळेल. ज्याचा अर्थ असा आहे की, मुख्य सेल सुरु होण्याच्या 24 तासांपूर्वचं त्यांना डील्सचा फायदा मिळेल.
Poco ने लॉन्च केला जबरदस्त कॅमेरासह दमदार बॅटरीचा स्मार्टफोन, पाहा किंमत किती?
advertisement
इलेक्ट्रॉनिक्स आणि गॅझेट्सवर मोठी सूट
टीझर पेजनुसार, फ्लिपकार्ट या सेल दरम्यान इलेक्ट्रॉनिक्स आणि घरगुती डिव्हाइसवर मोठी सूट देण्याची तयारी करत आहे. यावेळी स्मार्टफोन, लॅपटॉप, टॅब्लेट आणि ट्रू वायरलेस स्टीरिओ (TWS) इअरबड्स विशेषतः आकर्षक असतील. याव्यतिरिक्त, घरासाठी रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन आणि एअर कंडिशनर खरेदी करण्याची योजना आखणाऱ्यांसाठी ही सेल एक उत्तम संधी असेल. कंपनीने संकेत दिले आहेत की ब्लूटूथ स्पीकर्स आणि वेअरेबल डिव्हाइसेसवर "क्रेझी डील" देण्यात येतील.
बँक ऑफर्स आणि एक्सचेंज डील
फ्लिपकार्ट सामान्यतः त्याच्या सेल दरम्यान केवळ फ्लॅट डिस्काउंटच नाही तर बँक ऑफर्स देखील देते. म्हणूनच, अशी अपेक्षा आहे की प्रजासत्ताक दिनाच्या सेलमध्ये अतिरिक्त बचतीसाठी फ्लॅट डिस्काउंट आणि बँक ऑफर्स देखील देण्यात येतील. कंपनी निवडक बँकांकडून क्रेडिट आणि डेबिट कार्डवर 10% इन्स्टंट डिस्काउंट देण्याची अपेक्षा आहे. ग्राहकांना जुन्या स्मार्टफोन आणि लॅपटॉपसाठी एक्सचेंज बोनस आणि नो-कॉस्ट ईएमआय सारख्या पर्यायांचा देखील फायदा होऊ शकतो.
WhatsAppचा नवा धमाका! आणले 3 भारी अपडेट्स, सोपं होईल तुमचं काम
तुमची विशलिस्ट तयार करा
तुम्ही नवीन गॅझेट किंवा घरगुती उपकरण खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आताच तुमची विशलिस्ट तयार करण्यास सुरुवात करा. मायक्रोसाइट नियमितपणे नवीन ब्रँड आणि डील अपडेट करेल. सेल दरम्यान मर्यादित काळासाठी फ्लॅश सेल आणि गर्दीच्या वेळेसाठीच्या डीलवर लक्ष ठेवणे देखील योग्य आहे.
.
