TRENDING:

फोनसाठी हानिकारक आहेत हे 12 अ‍ॅप्स! गुपचूप चोरताय तुमचे पर्सनल फोटो आणि डेटा

Last Updated:

Apps Malware: एका लेटेस्ट रिपोर्टमधून समोर आलेय की, प्ले स्टोअरवर काही अ‍ॅप्स धोकादायक आहेत. हे अ‍ॅप्स त्वरित हटवण्याचा सल्ला दिला जातो.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली: अ‍ॅप्स कोणत्याही फोनसाठी आवश्यक असतात कारण ते वेगवेगळ्या कामांसाठी आपली गरज बनलेय. परंतु काहीवेळा असे देखील दिसून येते की काही अ‍ॅप्स आपल्यासाठी धोकादायक असतात. काही अ‍ॅप्स आपल्या फोनच्या डेटासाठीही नुकसानकारक असतात. दरम्यान, पुन्हा एक धक्कादायक बाब समोर आली आहे. प्ले स्टोअरवर असे 12 अ‍ॅप असल्याचे समोर आलेय. जे आपल्या फोनमधील फोटो आणि इतर डेटा चोरत आहेत. McAfee ने अशा काही अ‍ॅप्सची यादी जारी केली आहे ज्यांना 'Xamalicious' म्हणतात.
अ‍ॅप्स मालवेअर
अ‍ॅप्स मालवेअर
advertisement

कंपनीच्या म्हणण्यानुसार, मालवेअर-संक्रमित अ‍ॅप्स फोनमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी 'सोशल इंजिनिअरिंग' वापरतात. ज्यामुळे डिव्हाइसच्या यूझरला माहिती न मिळताच कमांड-अँड-कंट्रोल सर्व्हरसह कम्यूनिकेट करण्याची परवानगी मिळते.

iPhone 16 ते Samsung Galaxy S24, नव्या वर्षात लाँच होणार 'हे' दमदार फोन

दरम्यान, फसवणूक करणारा फोनवर दुसरा पेलोड डाउनलोड करतो आणि फोनचा संपूर्ण कंट्रोल घेतो. त्यानंतर तो यूझरच्या परवानगीशिवायच जाहिरातींवर क्लिक करतो. यासोबतच अ‍ॅप इंस्टॉल करतो. चला जाणून घेऊया यामध्ये लिस्टमध्ये कोणकोणत्या अ‍ॅप्सचा समावेश आहे.

advertisement

Essential Horoscope for Android

3D Skin Editor for PE Minecraft

Logo Maker Pro

Count Easy Calorie Calculator

Sound Volume Extender

LetterLink

Numerology: Personal horoscope & number predictions

Step Keeper: Easy Pedometer

Track Your Sleep

Numerology: Personal horoscope & number predictions

Astrological Navigator: Daily Horoscope & Tarot

Universal Calculator.

Tech News: 8 हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळू शकतात या जबरदस्त वॉशिंग मशीन; झटपट स्वच्छ होतील कपडे

advertisement

रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय की, हे अ‍ॅप सुमारे 3,27,000 डिव्हाइसला टार्गेट करत आहे. या अ‍ॅप्समध्ये, असे तीन अ‍ॅप्स आहेत जे 1,00,000 लोकांनी डाउनलोड केलेय. हे अ‍ॅप्स फोनवरून तात्काळ डिलीट करावेत, असे कंपनीने कठोर शब्दात म्हटले आहे.

मराठी बातम्या/टेक्नोलाॅजी/
फोनसाठी हानिकारक आहेत हे 12 अ‍ॅप्स! गुपचूप चोरताय तुमचे पर्सनल फोटो आणि डेटा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल