Tech News: 8 हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळू शकतात या जबरदस्त वॉशिंग मशीन; झटपट स्वच्छ होतील कपडे
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Washing Machine best deal: तुम्ही नवीन वॉशिंग मशिन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी अनेक डील आणि सूट उपलब्ध आहेत. येथे आम्ही तुम्हाला अशाच काही ऑप्शनविषयी सांगतोय, जे तुम्ही 8000 रुपयांपेक्षा कमी किमतीत घरी आणू शकता.
मुंबई : कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन खूप महत्त्वाचं असतं. विशेषतः हिवाळ्यात हाताने कपडे धुण्यासाठी गार पाण्यात हात टाकावा वाटत नाही. अशा परिस्थितीत वॉशिंग मशिन उपयोगी पडते. असे बरेच लोक आहेत ज्यांना असे वाटते की वॉशिंग मशीन महाग आहेत. म्हणून ते मशीन विकत घेत नाहीत. पण आज आम्ही तुम्हाला काही स्वस्त वॉशिंग मशिन्सची माहिती देणार आहोत. जे पाहून तुम्हीही वॉशिंग मशीन घरी आणण्याचा विचार कराल. आम्ही तुम्हाला अशा काही वॉशिंग मशीनबद्दल सांगत आहोत ज्यांची किंमत 8000 रुपयांपेक्षा कमी आहे.
NU 7 Kg सेमी-ऑटोमॅटिक टॉप लोड वॉशिंग मशीन 2023 मॉडेल 38% च्या डिस्काउंटवर खरेदी केले जाऊ शकते. हे वॉशिंग मशीन 12,990 रुपयांऐवजी 7,990 रुपयांना घरी आणता येईल. हे 7 किलो वजनाचे वॉशिंग मशीन सॉफ्ट क्लोज प्रीमियम टफ ग्लास लिडसह येते. त्याचा रंग बर्गंडी रेड आहे. यात सेमी-ऑटोमॅटिक कंट्रोल पॅनल आहे.
advertisement
DMR Model No DMR 30-1208 सिंगल ट्यूब टॉप लोड पोर्टेबल 3 किलो 4 स्टार मिनी वॉशिंग मशीन 1.5 किलो स्पिन ड्रायर बास्केटसह येते. हे वॉशिंग मशीन ग्राहक 14% च्या डिस्काउंटवर खरेदी करू शकतात. ही मशीन 5,599 रुपयांमध्ये खरेदी केली जाऊ शकते. याची खरी किंमत 6,499 रुपयांत खरेदी केली जाऊ शकते.
advertisement
Hilton 3 kg Single टब वॉशिंग मशीन स्पिन ड्रायर पोर्टेबल सिंगल टब वॉशर 5,999 रुपयांऐवजी 4,799 रुपयांना खरेदी करू शकतात. यावर 20% डिस्काउंट आहे. यात 190W चा ड्रायर आहे. हे वॉशिंग मशीन इन्व्हर्टरवरही चालू शकते.
VISE (by Vijay Sales) 6.5 kg सेमी-ऑटोमॅटिक टॉप लोड ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन 2 वॉश प्रोग्राम 47% च्या डिस्काउंटवर खरेदी केले जाऊ शकतात. डिस्काउंटनंतर हे वॉशिंग मशिन 15,000 रुपयांऐवजी 7,990 रुपयांना घरी आणता येईल. यामध्ये अनेक प्रकारचे वॉश प्रोग्राम उपलब्ध आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 01, 2024 8:50 AM IST
मराठी बातम्या/टेक्नोलाॅजी/
Tech News: 8 हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळू शकतात या जबरदस्त वॉशिंग मशीन; झटपट स्वच्छ होतील कपडे