Redmi A2: हा स्मार्टफोन 2GB + 64GB व्हेरिएंटसह Xiaomi च्या वेबसाइटवरून 5,299 रुपयांना खरेदी करू शकतात. हा फोन MediaTek Helio G36 प्रोसेसर, 5000 mAh बॅटरी, 8MP AI ड्युअल कॅमेरा सेटअप आणि 6.52-इंचाचा डिस्प्ले यांसारख्या चांगल्या फीचर्ससोबत येतो.
POCO C55 : हा स्मार्टफोन 4GB + 64GB व्हेरिएंटसह Amazon वरून 5,999 रुपयांना खरेदी करू शकतात. या फोनमध्ये 6.71-इंचाचा HD+ डिस्प्ले, 50MP AI ड्युअल कॅमेरा सेटअप, 5000mAh बॅटरी आणि MediaTek G85 प्रोसेसर यांसारख्या फीचर्ससह येतो.
advertisement
TECNO Spark 9 : ग्राहक हा फोन 4GB + 64GB व्हेरिएंटसह Amazon वरून 5,999 रुपयांना खरेदी करू शकतात. हा फोन 90Hz रिफ्रेश रेटसह 6.6-इंचाचा HD+ डिस्प्ले, 13MP रीअर कॅमेरा सेटअप, MediaTek Helio G37 प्रोसेसर, 5000mAh बॅटरी आणि 8MP सेल्फी कॅमेरासह येतो.
वाचा - कारमध्ये आहेत का हे स्मार्ट फीचर, करतात का पर्सनल डेटा लीक? असं चेक करा
कमी बजेटमध्ये फोन कसा घ्यावा?
फोन ऑफलाईन घ्यायचा असो की ऑनलाईन तुम्ही तो डिस्काउंटमध्ये नक्कीच मिळवू शकता. यासाठी तुम्हाला थोडे कष्ट घ्यावे लागतील. सध्या सणासुदीत मोबाईल कंपन्या खरेदीवर बंपर ऑफर देत असतात. त्यामुळे स्मार्टफोन घेताना जर सणासुदीत घेतला तर तुम्हाला नक्कीच स्वस्तात मिळू शकतो. दुसरं म्हणजे अनेक बँकाही मोबाईलवर चांगल्या ऑफर्स देतात. अशावेळी तुम्ही त्याचाही वापर करुन फोनवर चांगला घसघशीत सूट मिळवू शकता. विशेषकरुन बँकांच्या क्रेडीट कार्डसवर चांगल्या ऑफर मिळतात. जर तुम्ही ऑफलाईन फोन घेत असाल तर इ कॉमर्स वेबसाईटवरही एकदा चेक करा. जिथे तुम्हाला चांगली ऑफर मिळत असेल तो पर्याय निवडू शकता.
