TRENDING:

WhatsApp वर फोटो सेंड केल्याने क्वालिटी खराब होते? HD मध्ये असे करा सेंड

Last Updated:

WhatsApp HD Photo Send: खराब क्वालिटीचे फोटोज सर्वच मजा घालवतात. त्यामुळे तुम्हाला हाय क्वालिटीचे फोटो कुटुंब किंवा मित्रांना पाठवायचे असतील तर एक अतिशय सोपी ट्रिक आहे. याच्या मदतीने तुम्ही व्हॉट्सॲपवर HD क्वालिटीचे फोटो पाठवू शकाल. व्हॉट्सॲपच्या या ट्रिकबद्दल जाणून घेऊया.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Send HD Photo on WhatsApp: आजकाल प्रत्येकजण व्हॉट्सॲपद्वारे आपल्या कुटुंबीयांशी आणि मित्रांशी जोडलेला असतो. हे जगातील सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मपैकी एक आहे. तुम्ही व्हॉट्सॲपवर एकमेकांना फोटो, व्हिडिओ आणि फाइल्स पाठवू शकता. पण आपण आपल्या कुटुंबीयांना किंवा मित्रांना व्हॉट्सॲपद्वारे फोटो पाठवतो आणि त्यांची क्वालिटी खूपच खराब असते तेव्हा मूड खराब होतो. तुम्हीही फोटोंच्या खराब क्वालिटीने कंटाळले असाल, तर आम्ही तुमच्यासाठी HD मध्ये फोटो पाठवण्याचा एक सोपा मार्ग घेऊन आलो आहोत.
व्हॉट्सअॅप फोटोज
व्हॉट्सअॅप फोटोज
advertisement

WhatsApp वर कमी क्वालिटीचे फोटो सेंड करण्याची डिफॉल्ट सेटिंग असते. हे स्टोरेज वाचवण्यासाठी आणि इंटरनेट डेटा वापर कमी करण्यासाठी केले जाते. पण जेव्हा आपण चांगल्या क्वालिटीचे फोटो पाठवतो तेव्हा या सेटिंगमुळे समोरच्यापर्यंत चांगल्या क्वालिटीचा फोटो पोहोचत नाही. पण एका ट्रिकने तुम्ही HD मध्ये फोटो पाठवू शकाल.

Airtel चा 99 रुपयांचा प्लान, मिळेल अनलिमिटेड डेटा

advertisement

WhatsApp: HD फोटो कसे पाठवायचे

WhatsApp वर HD मध्ये फोटो पाठवण्याची पद्धत खूप सोपी आहे, फक्त या स्टेप्स फॉलो करा.

- तुम्हाला HD फोटो पाठवायचा आहे त्या व्यक्ती किंवा ग्रुपसोबतच्या चॅट उघडा.

- आता अटॅचमेंट आयकनवर जा आणि तुमच्या फोन गॅलरीमधून एक फोटो निवडा.

- तुम्ही फोटो सिलेक्ट केल्यावर तुम्हाला सर्वात वर एक HD ऑप्शन दिसेल, तो निवडा.

advertisement

- HD ऑप्शन निवडल्यानंतर, हाय-डेफिनिशन फोटो शेअरिंग अॅक्टिव्ह केले जाईल आणि हाय क्वालिटीचा फोटो पाठवला जाईल.

iphone स्लो चार्ज होतोय का? फॉलो करा या ट्रिक, सुपरफास्ट होईल चार्ज

या गोष्टी लक्षात ठेवा

जेव्हा तुम्ही HD फोटो पाठवता तेव्हा त्याला HD असे लेबल लावले जाते. तुम्ही WhatsApp द्वारे फोटो शेअर करता तेव्हा तुम्हाला HD निवडण्याचा ऑप्शन मिळतो. हे हाय-डेफिनिशन इमेज शेअर करेल.

advertisement

तुमचे इंटरनेट स्लो असेल किंवा तुम्हाला डेटा सेव्ह करायचा असेल, तर तुम्ही फोटोची क्वालिटी निवडू शकता. तुमच्या गरजेनुसार, तुम्ही सामान्य फोटो आणि हाय-डेफिनिशन फोटोंमध्ये बॅलेन्स राखू शकाल.

मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
WhatsApp वर फोटो सेंड केल्याने क्वालिटी खराब होते? HD मध्ये असे करा सेंड
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल