iphone स्लो चार्ज होतोय का? फॉलो करा या ट्रिक, सुपरफास्ट होईल चार्ज
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
तुमचा जुना किंवा नवीन फोन हळू चार्ज होत असेल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे. येथे आम्ही तुम्हाला काही ट्रिक्स सांगणार आहोत, ज्याचे पालन केल्यानंतर तुमच्या फोनची ही समस्या दूर होईल. येथे जाणून घ्या फोन चार्ज करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात.
मुंबई : एक वेळ अशी येते जेव्हा आयफोनमध्ये स्लो चार्जिंगची समस्या दिसू लागते. बऱ्याच वेळा ही समस्या नवीन iPhones मध्ये देखील दिसून येते. शेवटी, हे का घडते, आयफोन हळू का चार्ज होतो आणि हा प्रॉब्लम कसा दूर करायचा? याबद्दल संपूर्ण डिटेल्स येथे वाचा. आता तुमचा आयफोन फास्ट चार्ज होण्यास सुरुवात होईल आणि बॅटरी देखील जास्त काळ टिकेल. याशिवाय फोन स्लो चार्ज होण्यामागे कोणती कारणे आहेत हे देखील आपण जाणून घेऊया.
चार्जिंग करताना या गोष्टी लक्षात ठेवा
ओरिजनल चार्जर: सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही नेहमी ओरिजनल चार्जरनेच आयफोन चार्ज करा. काही यूझर्स याकडे दुर्लक्ष करतात आणि नेहमीच कोणत्याही चार्जरने फोन चार्ज करतात. याचा परिणाम आयफोनच्या बॅटरीवर होतो.
एअरप्लेन मोड : आयफोन जुना असेल तर चार्जिंग करताना फोन एअरप्लेन मोडवर ठेवून चार्ज करण्याचा प्रयत्न करा. यामुळे, सर्व नेटवर्क कनेक्शन बंद होतात आणि बॅटरीवर कमी लोड पडतो. फोनवर काहीही चालू नसताना चार्जिंगची स्पीड वाढू शकते.
advertisement
फास्ट चार्जिंग: आयफोन चार्ज करण्यासाठी तुम्ही फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेले चार्जर वापरावे. जुने iPhone 8 किंवा त्यावरील मॉडेल फास्ट चार्जरने चार्ज केले जाऊ शकतात. तुम्ही 18W किंवा अधिक क्षमतेचा चार्जर घेऊ शकता.
बॅकग्राउंडवर चालणारे ॲप्स: फोन चार्ज करताना पूर्णपणे फ्री ठेवावा, त्यात कोणतेही ॲप्लिकेशन चालू ठेवू नका, इंटरनेट आणि वायफाय बंद ठेवा. याशिवाय गेम्स बंद करा.
advertisement
मोबाईल हीटिंग: फोन चार्जिंग दरम्यान गरम होत असेल तर फोनच्या मागील कव्हरमध्ये काही ठेवले आहे का ते तपासा, बरेचदा लोक त्यात पैसे, कार्ड इत्यादी ठेवतात, याशिवाय, मागील कव्हर जाड असेल तर ते काढून टाका आणि मग फोन चार्ज करा. यामुळे फोनला योग्य हवा मिळते आणि त्याचे तापमानही योग्य राहते.
बरेच लोक नवीन आयफोन घेतात पण जुन्या चार्जरने चार्ज करत राहतात. लक्षात ठेवा की लेटेस्ट आयफोन मॉडेल्स केवळ डेडिकेटेड चार्जरने चार्ज करा.
advertisement
तुमचा आयफोन अजूनही हळू चार्ज होत असेल, तर तुमचा फोन Apple च्या सर्व्हिस सेंटरमध्ये घेऊन जा. यानंतर तुमची या समस्येपासून सुटका होईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 03, 2024 4:24 PM IST